TOP NewsUncategorizedताज्या घडामोडीमुंबई

राज्यसभेच्या उमेदवारावरून काँग्रेसमध्ये नाराजी, आज हायकमांडला भेटणार

मुंबई : राज्यसभा निवडणुकीतील उमेदवारीच्या निमित्ताने शिवसेना आणि संभाजीराजे छत्रपती यांच्यातील संघर्ष ताजा असताना आता काँग्रेसमधील अंतर्गत कलह उफाळून आल्याचे दिसत आहे. राज्यसभेसाठी महाराष्ट्रातून राज्याबाहेरील व्यक्तीस संधी दिली जाणार असल्याची शक्यता असून राज्यातील काँग्रेस नेत्यांनी वर्तवली असून पक्षश्रेष्ठींच्या निर्णयावर जाहीरपणे नाराजी व्यक्त करायला सुरुवात केली आहे. प्रसंगी विरोधी मतदानही होऊ शकते, असे राज्यातील काँग्रेस नेत्यांनी म्हटले आहे.

महाराष्ट्रातून राज्यसभेवर इम्रान प्रतापगढी यांना पाठविण्यासाठी काँग्रेस पक्षश्रेष्ठी उत्सुक असल्याचे समजते. प्रतापगढी हे काँग्रेस पक्षाचे अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष आहेत. अल्पसंख्याक धर्मातील व्यक्तीस महाराष्ट्रामधून राज्यसभेची उमेदवारी देण्यासाठी प्रियांका वाड्रा या आग्रही असल्याचे समजते. राज्यातील अनेक नेते इच्छुक असताना राज्याबाहेरील नेत्याला संधी मिळणार असल्याने काँग्रेसचे स्थानिक नेते नाराज असल्याचे समोर आले आहे.

राज्यातून काँग्रेसतर्फे मिलिंद देवरा, मुकुल वासनिक, अविनाश पांडे आदी नेत्यांची नावे राज्यसभेसाठी चर्चेत होती. मात्र इम्रान प्रतापगढी यांचे नाव दिल्लीच्या वर्तुळातून चर्चेत आल्यानंतर इच्छुक नेत्यांच्या समर्थकांमध्ये रविवारी मोठी नाराजी पसरल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले. राज्यातील उमेदवार दिल्यास विरोध करण्याचा प्रश्नच उदभवत नाही, मात्र अशाप्रकारे इतर राज्यांतील उमेदवार दिला गेल्यास याचा निषेध म्हणून विरोधात मतदान होऊ शकते, असेही एका नेत्याने सागितले. राज्यसभा निवडणुकीत काँग्रेस पक्ष एक जागा निश्चितच जिंकू शकतो. त्यामुळे हा उमेदवार राज्यातीलच असावा, असा महाराष्ट्र काँग्रेसमधील नेतेमंडळीचा आग्रह असल्याचे समजते.

पक्षश्रेष्ठींकडून दखल

काँग्रेसमधील या नाराजीची पक्षश्रेष्ठींनी दखल घेतली असून राज्यातील ज्येष्ठ नेत्यांना आज, सोमवारी दिल्ली येथे बोलावले असल्याचे समजते. अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आदी नेते यासाठी दिल्लीला जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button