breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

विविध विकास कामांसाठी पावणे चार कोटीचा निधी मंजूर – सभापती विलास मडिगेरी

पिंपरी |महाईन्यूज|

पिंपरी चिंचवड शहरातील विविध विकास कामांसाठी सुमारे ०३ कोटी ७६ लाख रुपयांच्या खर्चास आज (बुधवार) स्थायी समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. स्थायी समिती सभागृहात झालेल्या या सभेच्या अध्यक्षस्थानी विलास मडीगेरी होते.

प्रभाग क्र.२० संत तुकारामनगर येथील विविध भागात स्थापत्य विषयक कामे करणेकामी येणा-या सुमारे २५ लाख २९ हजार रूपयांच्या खर्चास या बैठकीत मान्यता देण्यात आली. चिखली येथील पाण्याची उंच टाकी भोवती क्वॉटर्स बांधणे व स्थापत्य विषयक कामे करणेकामी येणा-या सुमारे २६ लाख ५४ हजार रूपयांच्या खर्चास या बैठकीत मान्यता देण्यात आली.

कासारवाडी मैलाशुध्दीकरण केंद्राअंतर्गत प्रभाग क्र.४ मधील दिघीमधील कृष्णानगर परिसरातील मलनि:सारण विषयक कामे करणेकामी येणा-या सुमारे ३१ लाख ३७ हजार रूपयांच्या खर्चास या बैठकीत मान्यता देण्यात आली. कासारवाडी मैलाशुध्दीकरण केंद्राअंतर्गत प्रभाग क्र.९ मध्ये वार्षिक ठेकेदारी पध्दतीने ड्रेनेजलाईन व चेंबरची देखभाल दुरुस्ती करणेकामी येणा-या २९ लाख ९६ हजार रूपयांच्या खर्चास या बैठकीत मान्यता देण्यात आली.

च-होली मैलाशुध्दीकरण केंद्राअंतर्गत प्रभाग क्र.३ मधील डुडूळगांव परिसरात मलनि:सारण विषयक कामे करणेकामी येणा-या ३१ लाख २२ हजार रूपयांच्या खर्चास या बैठकीत मान्यता देण्यात आली. च-होली मैलाशुध्दीकरण केंद्राअंतर्गत प्रभाग क्र.३ मधील भोसरी मधील शास्त्रीचौक परिसरात मलनि:सारण विषयक कामे करणेकामी येणा-या ३२ लाख ७१ हजार रूपयांच्या खर्चास या बैठकीत मान्यता देण्यात आली.

च-होली मैलाशुध्दीकरण केंद्राअंतर्गत प्रभाग क्र.३ मधील डुडूळगांव येथील नाल्यातील मलवाहिनी सुधारणा करणेकामी येणा-या ३१ लाख ८९ हजार रूपयांच्या खर्चास या बैठकीत मान्यता देण्यात आली. मनपाच्या जलनि:सारण विभागाकडील च-होली मैलाशुध्दीकरण केंद्राअंतर्गत प्रभाग क्र.३ मधील जुन्या मलवाहिन्यांमध्ये सुधारणा विषयक कामे करणेकामी येणा-या ३८ लाख २७ हजार रूपयांच्या खर्चास या बैठकीत मान्यता देण्यात आली.

च-होली मैलाशुध्दीकरण केंद्राअंतर्गत प्रभाग क्र.३ मधील मोशी येथील लक्ष्मीनगर नाल्यातील मलवाहिनी सुधारणा कामे करणेकामी येणा-या ३२ लाख ६७ हजार रूपयांच्या खर्चास या बैठकीत मान्यता देण्यात आली. च-होली मैलाशुध्दीकरण केंद्राअंतर्गत प्रभाग क्र.३ मधील भोसरी बणाचा ओढा व वाळके मळा परिसरात मलवाहिनी सुधारणा कामे करणेकामी येणा-या ३२ लाख २६ हजार रूपयांच्या खर्चास या बैठकीत मान्यता देण्यात आली. च-होली मैलाशुध्दीकरण केंद्राअंतर्गत प्रभाग क्र.३ मधील साई मंदीर, वडमुखवाडी,चोविसावाडी परिसरात मलनि:सारण विषयक कामे करणेकामी येणा-या ३२ लाख ३० हजार रूपयांच्या खर्चास या बैठकीत मान्यता देण्यात आली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button