TOP NewsUncategorizedताज्या घडामोडीमुंबई

‘अमेरिकेत गांजा घेतला होता’, आर्यन खानची ‘एनसीबी’समोर कबुली

मुंबई : अमेरिकेत शिकत असताना झोप न येण्याचा त्रास असल्याने गांजा घेण्यास सुरुवात केली होती, अशी कबुली आर्यन खानने नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोला (एनसीबी) दिली आहे. यासंबंधीच्या आरोपपत्रात त्याचा उल्लेख असल्याचे सांगितले जात आहे.

कोर्डेलिया क्रुझ अमली पदार्थप्रकरणी एनसीबीने दोनच दिवसांपूर्वी आरोपपत्र दाखल केले. त्यामध्ये आर्यनसह अन्य पाच आरोपींचे नाव वगळण्यात आले आहे. पण याप्रकरणी एनसीबीच्या चौकशीत त्याने दिलेला जबाब आरोपपत्रात नमूद आहे. ‘अमेरिकेत पदवीचे शिक्षण घेत असताना झोप न येण्याचा त्रास होता. त्यावर मात करण्यासाठी २०१८मध्ये गांजा घेण्यास सुरुवात केली होती. गांजा घेतल्याने या समस्येवर मात करता येते, असे इंटरनेटवर वाचले होते. त्यामुळेच गांजा घेत होतो. तसेच लॉस एंजेलिसला असताना एकदा आनंद म्हणून मारिजुआना या अमली पदार्थांचे सेवन केले होते’, असे आर्यनने या जबाबात मान्य केल्याचे सूत्रांनी सांगितले.

या प्रकरणात आर्यनचा मोबाइल जप्त केल्यानंतर त्याच्या व्हॉट्सअॅप चॅटमध्ये अमली पदार्थांसंबंधी संभाषण एनसीबीच्या तपास पथकाला आढळले होते. ‘ते व्हॉट्सअॅप संभाषण माझेच होते. तसेच वांद्रे परिसरातील एका अमली पदार्थ दलालादेखील ओळखतो. त्याचे नाव किंवा नेमकी जागा माहीत नाही. पण मित्र अर्चितमुळे त्याला ओळखतो. त्याच्याशी डोखा या नावे अमली पदार्थ आणण्यासंबंधी चॅट केले आहे. तसेच अभिनेत्री अनन्या पांडे हिलादेखील अमली पदार्थ मिळविण्यासंबंधी संदेश पाठवला होता’, अशी महत्त्वाची कबुली आर्यनने एनसीबीसमोर दिली आहे. यामधील अर्चित हादेखील या प्रकरणातील एक आरोपी आहे.

आर्यनला सोडण्यासाठी खंडणी नाही

आर्यन खानला या प्रकरणातून सोडण्यासाठी अभिनेता शाहरुख खानकडे खंडणी मागितली किंवा खंडणी उकळण्याचे नियोजन करण्यात आले होते, अशी कुठलिही शक्यता या प्रकरणातील दक्षता समितीला आढळली नाही. आर्यनच्या अटकेनंतर रंगलेल्या नाट्यात प्रकरणातील साक्षादार प्रभाकर सैल यांनी तपास पथकप्रमुख समीर वानखेडे यांचा २५ कोटी रुपये उकळण्याचा डाव होता, असा आरोप केला होता.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button