breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणेमहाराष्ट्र

Ashadhi Wari 2023 : जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान

Pune : जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचा पालखी प्रस्थान सोहळयाला आजपासून सुरुवात होत आहे. यावर्षीचा हा ३३८ वा पालखी सोहळा मोठ्या उत्साहात आणि भक्ती भावामध्ये संपन्न झाला. तुकोबांच्या पालखीने पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान केलं आहे. पालखीचा आजचा मुक्काम हा इनामदार वाड्यात असेल. पुन्हा उद्या पालखी पंढरपूरच्या दिशेने मार्गस्त होईल.

टाळ- मृदुंगाच्या गजरात हजारो भाविक देहूत दाखल झाले असून मोठ्या उत्साहात आणि भक्ती भावामध्ये तुकोबांच्या पालखीचे पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान झाले आहे.

हेही वाचा – ‘लिव्ह ईन रिलेशनऐवजी रितसर लग्न करा’; चित्रा वाघ यांचा सल्ला

पहाटेपासून विधिवत पूजा, आरती नंतर या सोहळ्याची सुरुवात झाली. पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील, मावळ चे खासदार श्रीरंग बारणे, आमदार उमा खापरे, हर्षंवर्धन पाटील, सुनेत्रा पवार, आमदार सुनील शेळके, यांच्या उपस्थितीत पूजा संपन्न झाली.

वर्षातून एकदा येणाऱ्या या आषाढी वारीसाठी देहू, आळंदीमध्ये हजारो वारकरी दाखल होतात. ज्ञानोबा-तुकोबाच्या गजरामध्ये देहभान हरपून टाळ- मृदंगाच्या तालावर स्वतःला झोकून दिल्याचं पाहायला मिळालं. फुगडी, भगवी पताका घेऊन एक- एक दिंडी मंदिरातून पंढरपूरच्या दिशेने वाटचाल करत आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button