TOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडमहाराष्ट्रराजकारण

महिलांना सामान्य करात दिलेली सूट पूर्ववत करा; राष्ट्रवादीच्या महिला शहराध्यक्षा प्रा. कविता आल्हाट

पिंपरी : पिंपरी चिंचवड महापालिका प्रशासनाने महिलांना सामान्य करामध्ये 50 टक्के सूट जाहीर केली. काही कालावधीनंतर या सवलतीमध्ये घट करत ही सवलत 30 टक्क्यांवर आणली आहे. हा एक प्रकारे महिलांवर अन्याय असून सामान्य करातील सूट पूर्ववत करावी, अन्यथा आंदोलन छेडले जाईल असा इशारा राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या शहराध्यक्ष प्रा. कविता आल्हाट यांनी दिला आहे.

याबाबत प्रा. कविता आल्हाट यांनी आयुक्त शेखर सिंह यांना निवेदन दिले आहे. या निवेदनात आल्हाट यांनी म्हटले आहे की, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सामान्य करामध्ये महिलांना 50 टक्के सवलत होती. परंतु प्रशासनाने या सवलती मध्ये घट केली. आता 50 टक्के ऐवजी महिलांना करामध्ये 30 टक्के केलेली आहे. एकीकडे सरकार महिलांच्या सबलीकरणाचा विचार करते आहे. आणि दुसरीकडे पिंपरी चिंचवड महानगरपालिका महिलांना सवलती पासून वंचित ठेवण्याचे काम करत आहे. तातडीने महापालिकेने ही सवलत पूर्ववत करावी याबाबतचे आदेश आयुक्तांनी द्यावेत अन्यथा राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने आंदोलन करण्यात येईल असा इशारा आल्हाट यांनी दिला आहे.

यावेळी शहराध्यक्ष अजित गव्हाणे, जेष्ठ नेते नाना काटे, माजी महापौर संजोग वाघेरे, युवक अध्यक्ष इम्रान शेख, नगरसेवक मोरेश्वर भोंडवे, राजू मिसाळ, प्रशांत शितोळे, वरिष्ठ कार्याध्यक्ष कविता खराडे, अर्बन सेल अध्यक्ष मनीषा गटकळ, मुख्य सांघटिका मिरा कदम, आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button