पिंपरी / चिंचवड

पिंपरी, चिंचवड, दिघी, वाकडमध्ये चार चो-या : 7 लाख 62 हजारांचा ऐवज चोरीला

पिंपरी l प्रतिनिधी

पिंपरी, चिंचवड, दिघी आणि वाकड पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोरीच्या चार घटना घडल्या आहेत. याप्रकरणी गुरुवारी (दि. 21) गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे. या चार घटनांमध्ये दोन मोबाईल फोन, रोख रक्कम, डंपर आणि दागिने असा एकूण सात लाख 62 हजार 500 रुपयांचा ऐवज चोरीला गेला आहे.

चिंचवडमधून दोन मोबाईल हिसकावले

किरण अशोक सोनवणे यांचा 15 हजार तर नितेश ढगे यांचा 10 हजारांचा मोबाईल फोन दुचाकीवरून आलेल्या चोरट्याने जबरदस्तीने हिसकावून चोरून नेला. किरण सोनवणे यांनी याप्रकरणी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या घटना गुरुवारी (दि. 21) पहाटे साडेपाच वाजताच्या सुमारास एसकेएफ कंपनी गेट समोर आणि मोरया गोसावी मंदिराच्या समोर घडल्या.

वकिलाने घरात घुसून रोकड चोरली

दिनेश बाटुमल देवनानी (वय 41, पिंपरी रेल्वे स्टेशन जवळ) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. बुधवारी (दि. 20) पहाटे चार वाजता वकील असलेल्या दिनेश धरमदास लालवाणी (वय 50, रा. पिंपरी) यांनी फिर्यादी यांच्या घरात घुसून त्यांना बट सारख्या साधनाने डोक्यात मारले. त्यानतंर फिर्यादी यांच्या घरातून 50 हजार रुपये रोख रक्कम जबरदस्तीने चोरून नेली.

दिघी मधून डंपर चोरीला

दिघी येथील ओम स्टोन खडी मशीनच्या बाजूला पार्क केलेला तीन लाख रुपये किमतीचा डंपर अज्ञात चोरट्यांनी चोरून नेला. ही घटना 19 एप्रिल रोजी दुपारी उघडकीस आली. याप्रकरणी मोहमद करीम फौजदार (वय 40, रा. मोशी) यांनी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

उघड्या दरवाजावाटे 15 तोळे सोन्याचे दागिने चोरीला

दरवाजा उघडा ठेऊन इस्तेमा (सत्संग) साठी गेल्यानंतर अज्ञात चोरट्याने उघड्या दरवाजा वाटे घरात प्रवेश केला. घरातून 155 ग्राम वजनाचे तीन लाख 87 हजार 500 रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेले. ही घटना गुरुवारी (दि. 21) दुपारी थेरगाव येथे घडली. याप्रकरणी ताजुद्दीन कासम तांबोळी (वय 56, रा. थेरगाव) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button