breaking-newsक्रिडाताज्या घडामोडीपुणे

गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्जचा सलग दुसरा पराभव, लखनऊ संघाचा सहा गडी राखून दणदणीत विजय

पुणे |

मागील वर्षीच्या विजेतेपदासह एकूण चार वेळा आयपीएल स्पर्धा जिंकणाऱ्या चेन्नई सुपर किंग्जला यावर्षीच्या सलग दुसऱ्या पराभवाला काल सामोरे जावे लागले. 210 धावाचे मोठे आव्हान उभे केल्यानंतरही लखनऊच्या फलंदाजांना रोखण्यासाठी जडेजा आणि धोनीने केलेले सर्व प्रयत्न एविन लेविस, बदोनी आणि डीकॉकने हाणून पाडले आणि लखनऊ संघाने माजी विजेत्यांना सहा गडी राखत मात दिली आणि आपला पहिला-वहिला विजय तो ही मोठ्या संघाविरुद्ध मिळवून इतर संघानाही धोक्याचा इशारा दिला आहे. जबरदस्त आक्रमक फलंदाजी करत अशक्य वाटणाऱ्या  विजयाला मिळवून देणाऱ्या एविन लेविसला सामनावीर म्हणून गौरविण्यात आले.

आज मुंबईच्या ब्रेबॉन मैदानावर झालेल्या या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्सचा कर्णधार के एल राहुलने चेन्नईच्या जडेजाविरुद्ध नाणेफेक जिंकताच प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. चेन्नई संघाच्या डावाची सुरुवात ऋतूराज गायकवाड आणि रॉबिन उथप्पा यांनी केली.गत हंगामात सर्वधिक धावा करून सर्वाना प्रभावित करून आंतरराष्ट्रीय संघात स्थान मिळणाऱ्या ऋतुराज गायकवाडला या हंगामात मात्र अजूनही मोठ्या धावा काढण्यात यश आलेले नाही. आज त्याने फक्त एक धाव काढलेली असताना एक चोरटी धाव घेण्याचा त्याचा प्रयास रवी बिष्णोईच्या चपळ क्षेत्ररक्षणाने फसला आणि ऋतूराज केवळ एक धाव काढून तंबुत परत गेला. त्यानंतर आलेल्या मोईनने मात्र रॉबिनला चांगली साथ देत चेन्नईचा डाव बऱ्यापैकी सावरला.या दोघांनी दुसऱ्या गड्यासाठी 54 धावांची भागीदारी केली.दोघेही चांगले भरात आलेत असे वाटत असतानाच रॉबिन उथप्पा (27 चेंडूत 8 चौकार आणि एक षटकारासह50 धावा) आपले 26 वे आयपीएल अर्धशतक पूर्ण होताच रवी बिष्णोईच्या गोलंदाजीवर पायचीत झाला आणि चेन्नई संघाला दुसरा धक्का बसला.

त्यावेळी त्यांची धावसंख्या 2 बाद 84 अशी होती. ज्यात केवळ 22 धावांची भर पडलेली असताना मोईन अलीची आक्रमक खेळी आवेश खानने संपवली. त्याने 22 चेंडूत चार चौकार आणि दोन षटकाराच्या मदतीने 35 धावा केल्या.त्याच्या जागी आलो तो शिवम दुबे. त्याने अंबाती रायडूच्या साथीने चौथ्या गड्यासाठी 60 धावांची चांगली भागीदारी करताना चेन्नई संघाचा डाव बऱ्यापैकी सावरला. रायडू 20 चेंडूत 27 धावा काढून रवी बिष्णोईच्या गोलंदाजीवर त्रिफळाबाद झाला. प्रतिभावान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शिवम दुबेने आज ते सिद्ध करताना जबरदस्त फलंदाजीचे प्रदर्शन केले. दुर्दैवाने त्याचे अर्धशतक एकाच धावेने हुकले असले तरी त्याने केलेल्या 30 चेंडूतल्या 49 धावाचे मोल जराही कमी होत नाही. त्याची सुंदर खेळी आवेश खानने संपवली. पण त्याने संघाला चांगल्या स्थितीत आणून ठेवण्यात मोठा वाटा उचलला होता.

त्याने रचलेल्या पायावर कळस चढवला तो धोनी आणि जडेजा या माजी आजी कर्णधार जोडीने. याचदरम्यान धोनीने आपल्या  टी 20 कारकिर्दीत 7000 धावा पूर्ण केल्या,अशी कामगिरी करणारा तो सहावा भारतीय ठरला.पहिल्या सामन्यात अर्धशतक करणाऱ्या माहीने आज पहिल्याच चेंडूवर सिक्स मारत आपला फॉर्म, दर्जा आणि फिटनेस काय आहे ते जगाला पुन्हा एकदा दाखवून दिली. यामुळेच चेन्नई संघाने आपल्या निर्धारित 20 षटकात 210 धावांची मोठी आणि आव्हानात्मक धावसंख्या उभारण्यात यश मिळवले.लखनऊ संघाकडून रवी बिष्णोईने किफायतशीर गोलंदाजी करताना 24 धा वा देत 2 गडी बाद केले,त्याला आवेष खान आणि अँड्र्यू टायनेही तेवढेच बळी मिळवत चांगली साथ दिली.

आपला पहिला सामना गमावून सुरुवात करणाऱ्या लखनऊ संघाने या मोठया धावसंख्येचा पाठलाग करताना कसलेही दडपण ने  घेता जोरदार सुरुवात केली. कर्णधार के एल राहुल आणि डीकॉक जोडीने चेन्नईच्या सर्वच गोलंदाजांचा उत्तम सामना करत पहिल्या गड्यासाठी 99 धावांची मोठी आणि उत्तम सलामी देत आम्हीही लढवय्ये आहोत आणि जिंकण्यासाठीच खेळत आहोत असाच जणू संदेश दिला. याचदरम्यान डीकॉकने आपले 17 वे अर्धशतकही केवळ 36 चेंडूतच पूर्ण केले. दुसऱ्या बाजूने कर्णधार राहुलही जबाबदारीने खेळत होता. हे दोघेच चेन्नई संघाला पुरून उरतील असे वाटत असतानाच के एल राहुल वैयक्तिक 40 धावांवर असताना प्रिटोरियसच्या चेंडूला मैदानाबाहेर मारण्याच्या नादात चुकला आणि उरलेले काम रायडूने आनंदाने पूर्ण करत त्याचा झेल पकडला. राहुलने 26 चेंडूत 3 षटकार आणि दोन चौकार मारत 40 धावा केल्या.

त्याच्या जागी आलेल्या मनीष पांडेला आज काही खास करू शकला नाही आणि तुषार देशपांडेच्या गोलंदाजीवर तो ब्रावोच्या हातात झेल देवून बाद झाला. त्यानंतर फलंदाजीला आला तो एविन लेविस. त्याने अतिशय आक्रमक फलंदाजी सुरू केली.लखनऊच्या डावाला गती मिळतेय असे वाटत असतानाच  सुंदर खेळत असलेल्या डीकॉकची एकाग्रता भंग झाली आणि तो 61 धावांवर असताना प्रिटोरियसच्या गोलंदाजीवर चकला आणि चेंडू त्याच्या बॅटची कड घेऊन माहीच्या सुरक्षित ग्लोवज मध्ये जाऊन विसावला. डीकॉकने 45 चेंडूत 9 चौकारासह 61 धावांची मोठी खेळी केली. तो बाद झाल्यानंतरही लखनऊ संघाला उरलेल्या 32 चेंडूत 72 धांवा करायचे मोठे आव्हान होते.पहिल्या सामन्यात चांगली खेळी करणाऱ्या दीपक हुडा आणि लेविसवर संघाची पूर्ण मदार होती.या जोडीने खिंड लढवण्याची हिंमत दाखवली. शेवटच्या तीन षटकात गुजरात संघाला 40 धावांची आवश्यकता होती.

अठराव्या षटक घेवून आला तो या फॉरमॅट मधला सर्वात चतुर आणि खतरनाक गोलंदाज द्वेन ब्रावो. त्याच्या पहिल्याच चेंडूवर दीपक हुडाने खणखणीत षटकार मारून जोरदार सुरुवात केली,पण दुसऱ्याच चेंडूवर ब्राव्होने चमत्कार केला आणि दीपक हुडाच्या छोट्या खेळीचा अस्त केला. त्याने दुसऱ्या बॉलवर पण षटकार मारायचा प्रयत्न केला, पण तो फटका सपशेल हुकला आणि जडेजाने त्याचा सीमारेषेवर सुंदर झेल घेतला. या महत्वपूर्ण षटकात ब्रावोने 12 धावा खर्च केल्या असल्या तरी खतरणाक दीपक हुडाचा बळी मिळवून संघाला विजयासमीप आणले. 12 चेंडूत 34 धावा असे समीकरण असताना जडेजा ऐवजी धोनीच सर्व धुरा हाताळत आहे, असे जाणवत होते. हे महत्वपूर्ण आणि निर्णायक षटक टाकण्याची जबाबदारी शिवम पांडेच्या कोवळ्या खांद्यावर पडली, आणि याचाच अचूक फायदा घेत युवा आयुष बदोनीने घेत उत्तुंग षटकार मारत पांडेवर दडपण आणले.

हे दडपण शिवम पांडेला झेपले नाही आणि एविन लेविसने याचा जबरदस्त फायदा उठवत आपले वैयक्तिक चौथे आणि यावर्षीच्या स्पर्धेतले सर्वात वेगवान अर्धशतक पूर्ण करत पांडेच्या षटकात 25 धावा ठोकून सामना पूर्णपणे लखनऊ संघाच्या बाजूने झुकवला. त्यामुळे अखेरच्या षटकात 9 धावा हव्या असताना पहिल्या सामन्यात सुंदर फलंदाजी करून सर्वाना प्रभावित करणाऱ्या आयुश बदोनीने (9 चेंडूत दोन षटकार मारत केलेल्या नाबाद 19) मोक्याच्या क्षणी अतिशय प्रगल्भ फलंदाजी करत एक सनसनाटी आणि अविस्मरणीय विजय मिळवून दिला. या अप्रतिम फलंदाजीमुळे लखनऊ संघाने मोठया धावसंख्येचा यशस्वी पाठलाग करत  3 चेंडू आणि सहा गडी राखून एक जबरदस्त विजय मिळवत आपल्या नावावर दोन अंकाची नोंदही केली.

  • संक्षिप्त धावफलक
  • चेन्नई सुपर किंग्ज

20 षटकात 7 बाद 210
रॉबिन 50,शिवम दुबे 49,मोईन 35,रायडू 27 धोनी नाबाद 16
रवी बिष्णोई 24/2,टाय  40/2, आवेश खान 38/2

  • पराभूत विरुद्ध
  • लखनऊ जायंट्स
    19.3 षटकात 4 बाद 211
    डीकॉक 61,राहुल 40,लेविस नाबाद 55,आयुष नाबाद 19
    प्रिटोरियस 31/2,ब्रावो 35/1,तुषार देशपांडे40/1
Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button