ताज्या घडामोडीविदर्भ

सतीश उकेंवरील ईडी कारवाईनंतर फडणवीसांची प्रतिक्रिया

नागपूरः सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) गुरुवारी अॅड. सतीश उके आणि त्यांचे भाऊ प्रदीप या दोघांना अटक केली. सतीश उके (satish ukey) यांच्यावरील कारवाईनंतर महाविकास आघाडीत खळबळ उडाली आहे. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्यासह भाजप नेत्यांवर आरोप करीत न्यायालयात खटला दाखल केल्यानंतर उके चर्चेत आले होते. या सर्व प्रकरणावर आज देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. देवेंद्र फडणवीस हे नागपुरात प्रसारमाध्यमांसोबत बोलत होते.

सतीश उके प्रकरणाबद्दल मला याची काहीही कल्पना नाही. एका जमिनीच्या प्रकरणामध्ये नागपुरच्या पोलिसांनी एक गुन्हा दाखल केला होता. त्या गुन्ह्यात ईडीने तक्रार दाखल करुन ईडीने कारवाई केली आहे. तसेच नागपूर पोलिसांनी तक्रार केली होती. ही मूळ कारवाई नागपूर पोलिसांची आहे. त्यानुसारच ईडीने कारवाई केली आहे. त्यांच्याविरोधात २००५ पासून गुन्हे दाखल आहेत. वेगवेगळ्या न्यायाधीशांची तक्रार केल्याबद्दल त्यांच्यावर न्यायालयाने कारवाई केली आहे. सर्वोच्च न्यायालयाने त्यांची शिक्षा का वाढविण्यात येऊ नये, असं म्हटलं होतं. आता हे प्रकरण न्यायालयात प्रलंबित आहे, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

दरम्यान, या सर्व प्रकरणावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. राज्यात किंवा देशात भाजपच्या अत्याचारी व्यवस्थेविरुद्ध आवाज उठवणाऱ्यांविरोधात केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर करणे, हे प्रचलित तंत्र झाले आहे. सतीश उके हे रश्मी शुक्ला प्रकरणात माझे वकील होते. या पलीकडे माझा त्यांच्यांशी कोणताही घरगुती संबंध नाही. सतीश उके यांची अटक ही कायदेशीर बाब आहे. न्यायालयात या सगळ्या गोष्टींची चर्चा होईल. आपण एखाद्या प्रकरणात वकील नेमतो. वकील नेमला म्हणून तो आपलाच होतो का? त्यामुळे ज्या काही घटना त्यांच्यावैयक्तिक जीवनात केल्या असतील, जसा आर्थिक गैरव्यवहाराचा विषय, त्याच्याशी माझा संबंध नाही, असं नाना पटोले यांनी म्हटलं आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button