breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पिंपरी चिंचवडमध्ये तरुणीवर भरदिवसा चाकूने वार, गंभीर जखमी

पिंपरी –  थेरगांवमधील डांगे चौकात एका तरुणीवर भरदिवसा चाकूने वार करण्यात आले आहेत. गौरी माळी असं या घटनेत जखमी झालेल्या तरुणीचे नाव असून तिच्यावर वार करणाऱ्या विकास शेटे या तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे.

तरुणीवर चाकूने हल्ला केल्याची ही धक्कादायक सकाळी दहाच्या सुमारास घडली. जखमी तरुणी डांगे चौक येथील स्पंदन रुग्णालयात ‘रिसेप्शनिस्ट’ आहे. सकाळी ती नेहमीप्रमाणे कामावर येत असताना आरोपी विकासने पाठीमागून येऊन तिच्यावर चाकूने सपासप वार केले. या हल्ल्यात जखमी झालेल्या गौरीला एका खासगी रुग्णालयात उपचारसाठी दाखल करण्यात आले आहे.

या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी आरोपी विकास शेटे याला ताब्यात घेतलं आहे. मात्र हल्ल्याचे नेमकं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. याप्रकरणी वाकड पोलीस पुढील तपास करत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button