breaking-newsपुणे

इंदुरीकर महाराजांचा वाढदिवस; सर्वपक्षीय नेते एकाच रथावर

पुणे |महाईन्यूज|

इंदुरीकर महाराज हे आपलं भूषण असून संत परंपरेचा वारसा ते आपल्या किर्तन सेवेच्या माध्यमातून पुढे घेऊन जात आहेत. समाजातील अंधश्रद्धा दूर करुन शिक्षणाचं प्रमाण वाढावं आणि समाजात प्रेम, आपुलकी, एकोपा निर्माण करण्यासोबतच लोकांच्या मनातील द्वेषाची जळमटं दूर करण्याचं काम आपल्या स्वतंत्र शैलीने ते करत आहेत. केवळ उपदेशाचे डोस न पाजता आधी स्वतः सामाजिक कामाचा आदर्श त्यांनी निर्माण केलाय. त्यांच्या संस्थेत अनेक अनाथ, गरीब मुलं आज मोफत शिक्षण घेतात, ही आपल्या सर्वांसाठीच अभिमानाची गोष्ट आहे, असे रोहित पवार म्हणाले.

संगमनेर तालुक्यातील ओझर बुद्रुक येथे प्रसिद्ध कीर्तनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर यांचा वाढदिवस सोहळा शनिवारी पार पडला .यावेळी निवृत्ती महाराजांची रथातून मिरवणूक काढण्यात आली होती. या मिरवणुकीत शिवसेनेचे खासदार सदाशिव लोखंडे, राष्ट्रवादीचे राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, आमदार आशुतोष काळे, आमदार रोहित पवार, भाजपचे आमदार राधाकृष्ण विखे-पाटील, युवक काँग्रेस प्रदेश अध्यक्ष सत्यजित तांबे महाराजांच्या रथात बसले होते. तर निवृत्ती महाराजांना शुभेच्छा देण्यासाठी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, राष्ट्रवादीचे काँग्रेसचे युवा नेते रोहित पाटील यांनी हजेरी लावले होती. या कार्यक्रमानंतर सर्वच नेत्यांनी फेसबुकवर या कार्यक्रमाची माहिती दिली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button