breaking-newsपुणे

#Coronolockdown:मद्यविक्री बंद, पुण्यात उत्पादन शुल्क विभागाला 167 कोटींचा फटका

पुणे : ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनमुळे राज्यात मद्यविक्री बंद आहे. यामुळे पुण्यात उत्पादन शुल्क विभागाला 167 कोटी रुपयांचा फटका बसल्याची माहिती आहे. मद्यविक्रीतून राज्याच्या तिजोरीत मोठ्या प्रमाणावर महसूल जमा होतो. मद्यविक्री बंद असल्याने अनेक तळीरामांना चुटपूट लागून राहिली आहे.

पुणे शहर आणि जिल्ह्यात मिळून दररोज 90 हजार लिटर्स देशी दारुची विक्री होते. एक लाख लिटर्स परदेशी मद्य, तर एक लाख लिटर्स बिअर जिल्ह्यात विकले जाते. पुणे जिल्ह्यात 1400 बिअर शॉपी, 265 वाईन्स शॉप आणि 700 परमिट रुम्स आहेत. या माध्यमातून महिन्याला 167 कोटी रुपयांचा महसूल जमा होतो. परंतु मद्यविक्री बंद असल्याने पुण्यातून उत्पादन शुल्क विभागाला एका महिन्यात मोठा फटका बसला आहे.

दरम्यान, लॉकडाऊन संपेपर्यंत मद्यविक्री बंद राहणार असल्याचं राज्य उत्पादन विभागाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. ‘लॉकडाऊनमधून सूट देण्यात आलेल्या यादीत मद्यविक्री दुकानांचा समावेश नसला, तरी याबाबत काटेकोरपणे नियमावली तयार करुनच अंतिम तो निर्णय जाहीर केला जाईल.’ असं ट्वीट राजेश टोपे यांनी गेल्या आठवड्यात केलं होतं.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button