breaking-newsताज्या घडामोडीराजकारणराष्ट्रिय

लॉकडाउनसंदर्भातील चित्र होणार स्पष्ट; मुख्यमंत्र्यांसोबत पंतप्रधानांची बैठक सुरू

१४ एप्रिल रोजी लॉकडाउनची मुदत संपल्यानंतर केंद्र सरकारनं त्यामध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित करताना याची घोषणा केली होती. लॉकडाउनचा दुसरा टप्पा ३ मे रोजी संपत आहे. तर करोनाग्रस्त रुग्णांचा आकडाही वाढत आहे. दुसरीकडं आर्थिक संकटही डोकं वर काढायला लागलं असून, ३ मे नंतर काय होणार याकडे देशवासीयांचं लक्ष लागलं आहे. यासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सर्व राज्यातील मुख्यमंत्र्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिगद्वारे बैठक सुरू झाली आहे. या बैठकीनंतर लॉकडाउनसंदर्भातील चित्र काही प्रमाणात स्पष्ट होण्याची शक्यता आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button