breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपुणे

‘डिजिटल मीडिया’चे जिल्हा माहिती अधिकाऱ्यांना वावडे; निवडणूक पासेस नाकारले!

पुणे: भारताची डिजिटल मीडियाकडे वाटचाल सुरु असताना पुण्यातील जिल्हा माहिती अधिकारी कार्यालयातील अधिकारी यांनी पुण्यातील डिजिटल मीडियाला पासेस नाकारले आहेत. यामुळे डिजिटल मिडियामध्ये नाराजी आहे. यासंदर्भात डिजिटल मीडिया एडिटर जर्नालिस्ट असोसिएशनचे सदस्य शरद लोणकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विभागीय आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी राजेश देशमुख, जिल्हा माहिती अधिकारी यांना निवेदन दिले आहे.

यामध्ये म्हटले की, पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या मार्गदर्शनाखाली आता डिजिटल भारत सक्षम होत आहे. यापूर्वी राजेंद्र सरग नावाचे जिल्हा माहिती अधिकारी असताना त्यांनी पुण्यातील डिजिटल मिडियाला चांगले उत्तेजन आणि सहकार्य दिले आहे. त्यांच्यानंतर मात्र आता तशी परिस्थिती राहिलेली नाही, असे खेदाने नमूद करीत आहे. यापूर्वी झालेल्या विधानसभा, लोकसभा निवडणुकीत डिजिटल मिडियाला मतदान, मतमोजणी संदर्भात तसेच वेळोवेळी शासकीय स्तरावरून, निवडणूक आयोगाच्या स्तरावरून देण्यात येणारे पासेस देण्यात आलेले आहेत.

यावेळी आता कसबा आणि चिंचवड विधानसभेची पोटनिवडणूक होते आहे. या निवडणुकीतील मतदान, मतमोजणी पासेससाठी जिल्हा माहिती कार्यालयाने फोटो आणि पासेस मागविले होते. तथापि आज त्यांच्या कार्यालयातून डिजिटल मिडीयाला पासेस नाकारल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामागे काही कारण सांगण्यात आलेले नाही. डिजिटल मिडियाला आपण अशा प्रकारे अव्हेरू नये. हवे तर आवश्यक ते जरूर निकष लावावेत, मात्र डिजिटल मिडियाला वार्तांकनासाठी सहाय्य करावे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अपेक्षीत केलेल्या डिजिटल इंडियामधील डिजिटल मिडियाला भक्कम करण्यासाठी निराश करणार नाही, अशी अपेक्षा शरद लोणकर यांनी निवेदनातून व्यक्त केली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button