breaking-newsराष्ट्रिय

उत्तराखंडमध्ये ढगफूटी आणि मुसळधार पावसाचा इशारा

उत्तराखंड – सकाळी उत्तराखंड येथील पिठोरागडमधल्या मुन्सारी येथे आज अचानक झालेल्या मुसळधार पावसामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. तसेच देहरादून येथील वेधशाळेने पुढील 24 तासात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. उत्तराखंडला पुन्हा एकदा पावसाचा जोरदार तडाखा बसला असून त्यामुळे सर्वत्र पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे.

आज झालेल्या ढगफूटीमुळे सेराघाट येथिल जलविद्युत प्रकल्प असलेल्या धरणाचेही नुकसान झाले आहे. वाहत्या पाण्यामुळे धरणालाही तडे गेले आहेत. मात्र कोणत्याही प्रकारची जिवीतहानी झाल्याची नोंद या ठिकाणी करण्यात आलेली नाही. याबरोबरच रविवारी भूस्खलन झाल्यामुळे ऋषिकेश-गंगोत्री हा राष्ट्रीय महामार्ग क्र. 94 बंद करण्यात आला आहे. त्यामुळे पडलेल्या दरड काढून रस्ता साफ करण्यासाठी जिल्हा प्रशासनाचे प्रयत्न सुरु आहेत.

या ढगफूटीमुळे पुढील 24 तासात मुसळधार पाऊस पडणार असल्याचा इशारा देहरादून वेधशाळेने दिला आहे. तसेच नागरिकांनी सतर्क रहावे आणि गरज वाटल्यास रेड अलर्टही जाहीर करण्यात येईल, असेही वेधशाळेकडून कळवण्यात आले आहे.

देशाच्या उत्तर भागात मुसळधार पावसाची शक्‍यता… 
वेधशाळेच्या इशाऱ्यानुसार उत्तराखंडाबरोबर उत्तर प्रदेशच्या पूर्व भागामध्येही मुसळधार पावसाची शक्‍यता आहे. त्याचबरोबर पश्‍चिम बंगालचा उत्तरेकडील भाग, सिक्कीम, बिहार, आसाम, मेघालय आदी राज्यांमध्येही मुसळधार पावसाची शक्‍यता आहे.

हिमाचल प्रदेश, पश्‍चिम उत्तर प्रदेश आणि अरुनाचल प्रदेशातही तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्‍यता आहे. उत्तर हरियाणा, झारखंड, ओडिशा, नागालॅन्ड, मणिपूर, मिझोराम, त्रिपुरा, कोकण आणि गोवा, तामिळनाडू, लक्षद्विप आणि कर्नाटकच्या किनारपट्टीवरही पावसाची शक्‍यता वर्तवण्यात आली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button