breaking-newsताज्या घडामोडीपुणे

#CoronaVirus: पुण्यात दिवसभरात १०४ नवे रुग्ण, तिघांचा मृत्यू

पुणे : बुधवारी दिवसभरात पुणे, पिंपरी आणि परिसरात १०४ नव्या रुग्णांना करोनाची बाधा झाली आहे. त्यामुळे परिसरातील रुग्णांची संख्या १५९५ वर गेली आहे. दिवसभरात तीन रुग्णांचा मृत्यू झाला असून मृतांची एकूण संख्या ९० झाली आहे.

विभागीय आयुक्त कार्यालयाकडून बुधवारी रात्री याबाबत माहिती प्रसिद्ध करण्यात आली आहे. पुणे शहरात ९३, पिंपरी चिंचवडमध्ये सात आणि पुणे ग्रामीणमध्ये एका नव्या रुग्णाची भर पडली आहे. पुणे छावणी परिसरात बुधवारी तीन नवे रुग्ण आढळून आले आहेत. पिंपरी चिंचवडमध्ये ६५ वर्षीय महिलेचा तर पुण्यात ६५ आणि ७१ वर्षीय रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यांपैकी एक रुग्ण ससून रुग्णालयात दगावला. या सर्व रुग्णांना मधुमेहासह इतर गुंतागुंतीच्या आजारांची वैद्यकीय पाश्र्वभूमी होती.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button