breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

#CoronaVirus : पिंपरी-चिंचवडमधील तीन रूग्णांची चाचणी ‘निगेटिव्ह’, डॉक्टरांच्या प्रयत्नाला यश

पिंपरी| महाईन्यूज | प्रतिनिधी

पुण्यापाठोपाठ आता पिंपरी-चिंचवडमध्येही 3 कोरोना बाधितांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्याची माहिती पिंपरी महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील यांनी दिली आहे. या बातमीमुळे पिंपरीकरांसाठी ही आनंदाची वार्ता आहे.

दुबईहून 11 मार्च रोजी शहरात आलेल्या 3 प्रवाशांना कोरोनाची लागण झाल्याचं निष्पन्न झालं होतं. तेव्हापासून त्यांच्यावर महापालिकेच्या रुग्णालयात उपचार सुरू होते. काल त्यांच्या उपचाराचे 14 दिवस पूर्ण झाल्यावर पुन्हा एकदा कोरोनाची चाचणी करण्यासाठी त्यांच्या घशातील द्रव्य पाठविण्यात आले. तेव्हा काल रात्री उशिरा प्राप्त झालेल्या अहवालात तिघांचीही चाचणी निगेटिव्ह आली असून आज पुन्हा एकदा चाचणी केली जाईल, आणि पुढील अहवालही निगेटीव्ही आल्यास त्यांना लवकरच घरी सोडलं जाईल अस पाटील म्हणाले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button