breaking-newsताज्या घडामोडीपुणे

#CoronaVirus : पुण्यात २४ तासांमध्ये पाचजण कोरोनामुक्त

पुणे| महाईन्यूज | प्रतिनिधी

पुणे महापालिकेच्या डॉ. नायडू सांसर्गिक रुग्णालयात 24 तासांत 5 जण कोरोनामुक्त झाले आहेत, अशी माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली. तसेच 48 तासांत शहराच्या हद्दीत एकाही कोरोनाग्रस्त रुग्णाची भर पडली नाही, असंही त्यांनी सांगितलं आहे. त्यामुळे पुणेकरांसाठी ही एक दिलासादायक बातमी आहे.

महापौर मोहोळ म्हणाले की, ‘कोरोनाचं संकट मोठं असलं तरी त्यावर मात करता येत आहे, हा विश्वास महत्वाचा आहे. यासाठी महापालिकेची आरोग्ययंत्रणा अहोरात्र कष्ट घेत असून योग्य समन्वय आम्ही ठेवला आहे. कोरोनामुक्त होता येत असले तरी नागरिकांनी काळजी घेणं आवश्यकच आहे’

दरम्यान, भारतातील कोरोनाग्रस्त रुग्णांचा आकडा वाढला आहे. एकूण 606 रुग्ण कोरोनाव्हायरसच्या विळख्यात आहे. त्यापैकी 10 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक 122 रुग्ण आहेत. म्हणजे प्रत्येकी पाचवा रुग्ण हा राज्यातील आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button