breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय
#CoronaVirus: देशभरात ९९१ नवे पॉझिटिव्ह रुग्ण, कोरोनाग्रस्तांची संख्या १४ हजारांच्याही पुढे
देशभरात मागील चोवीस तासात ९९१ पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे देशातील करोनाग्रस्तांची संख्या १४ हजार ३७८ इतकी झाली आहे. कालपासून आजपर्यंत ४३ रुग्णांचा मृत्यू करोनाची लागण झाल्याने झाला आहे. देशभरात आत्तापर्यंत करोनाची लागण होऊन ४८० जणांचा मृत्यू झाला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सह सचिव लव अग्रवाल यांनी ही माहिती दिली आहे. देशभरात १९९२ रुग्ण हे बरे होऊन त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे असंही अग्रवाल यांनी स्पष्ट केलं.