breaking-newsताज्या घडामोडी
#CoronaVirus: मालेगावमध्ये कोरोनाचे आणखी आठ नवीन रुग्ण
नाशिक जिल्ह्यात आज करोनाचे आठ नवीन रुग्ण आढळून आले. हे सर्व मालेगाव शहरातील आहेत. यात चार वर्षीय बालिकेचाही समावेश आहे. एक वृद्धाचा मृत्यू झाला आहे. नाशिक जिल्ह्यात करोनाग्रस्त रुग्णांची संख्या १४२ पर्यंत पोहोचली आहे. करोनामुळे आतापर्यंत एकूण १२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.