Uncategorizedताज्या घडामोडीपुणे

शरद पवारांचे पुन्हा हटके ‘स्टाइल’ राजकारण; फडणवीसांनी एकाच वाक्यात दिली प्रतिक्रिया

इंदापूर : राज्यसभेच्या सहा जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीवरून सध्या राज्यातील राजकीय वातावरण तापू लागलं आहे. या सहा जागांपैकी महाविकास आघाडीकडे तीन तर भाजपकडे दोन जागा जाणार, हे जवळपास निश्चित आहे. मात्र सहाव्या जागेसाठी चुरशीची लढाई होण्याची शक्यता आहे. अशातच संभाजीराजे छत्रपती यांनी ही सहावी जागा लढवण्याची घोषणा केल्याने निवडणुकीतील रंगत आणखी वाढली आहे. या सर्व घडामोडींबाबत बोलताना भाजप नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना टोला लगावला आहे.

भाजपकडून संभाजीराजे छत्रपती यांना २०१६ मध्ये राष्ट्रपती नियुक्त खासदार म्हणून संधी देण्यात आल्यानंतर शरद पवार यांनी टीका केली होती. इतिहासात छत्रपती पेशव्यांची नेमणूक करत असत. मात्र आता पेशवेच छत्रपतींची निवड करू लागले आहेत, असा टोला पवारांनी लगावला होता. मात्र यंदाच्या निवडणुकीत शरद पवारांनीच सर्वात आधी संभाजीराजेंना आपला पाठिंबा जाहीर केला आहे. याबाबत प्रश्न विचारला असता देवेंद्र फडणवीस म्हणाले की, शरद पवारांची भूमिका कधी कोणाला कळली आहे का? ते काय भूमिका घेतात हे त्यांचं त्यांनाच माहीत असतं. त्यामुळे त्यावर प्रतिक्रिया न दिलेलीच बरी, असं फडणवीस यांनी म्हटलं आहे.

‘संभाजीराजेंना सुरक्षित जागा द्या’

राज्यसभेच्या निवडणुकीत संदर्भात पुढे बोलताना फडणवीस म्हणाले, भारतीय जनता पक्षाने संभाजीराजांना सहा वर्षे राष्ट्रपती कोट्यातून खासदार केले. आम्ही कधीही त्यांना पक्षाचा प्रचार करा असे सांगितले नाही. छत्रपती घराण्याविषयी आम्हीच निष्ठा दाखवली आहे. आता शरद पवार यांनी महाविकास आघाडीच्या वाटेची पहिली जागा संभाजीराजांना सोडावी असं मत त्यांनी व्यक्त केलं आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button