breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

#CoronaVirus: चिंता वाढली..! देशात अडीच लाख कोरोना बाधित, सात हजारांपेक्षा जास्त मृत्यू

लॉकडाउन शिथिल केल्यानंतर दिवसाणिक देशात करोनाबाधितांची संख्या वाढतच आहे. गेल्या २४ तासांत देशात ९९८३ करोनाबाधित रुग्ण सापडल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. देशातील एकूण करोनाबाधितांची संख्याही अडीच लाखांच्या पुढे गेली आहे. सोमवारी सकाळी वाढलेल्या नव्या रुग्णांमुळे देशातील एकूण करोनाबाधितांची संख्या दोन लाख ५६ हजार ६११ इतकी झाली आहे.

देशात गेल्या २४ तासांत २०६ जणांचा करोनामुळे बळी गेला आहे. देशातील एकूण बळींची संख्याही चिंताजणक आहे. देशात आतापर्यंत सात हजारांपेक्षा जास्त जणांचा मृत्यू झाला आहे. सोमवारी सकाळपर्यंत देशात ७१३५ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे.

समाधानाची बाब म्हणजे देशात आतापर्यंत जवळपास सव्वा लाख रुग्णांनी करोनावर मात केली आहे. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात आतापर्यंत एक लाख २४ हजार ९५ जणांनी करोनावर मात केली आहे. तर एक लाख २५ हजार ३८१ जणांनर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. रुग्ण बरे होण्याच्या प्रमाणात किंचित वाढ झाली असून ते ४८.२० टक्क्यांवरून ४८.३६ टक्क्यांवर गेले आहे. देशात रुग्णसंख्येत सातत्याने वाढ होत असली तरी, राष्ट्रीय स्तरावर समूह संसर्ग झाला नसल्याचे एम्सचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी म्हटले आहे. देशात गेल्या १० दिवसांत सुमारे २ हजार रुग्णांचा मृत्यू झाला असल्याचेही आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button