breaking-newsताज्या घडामोडीराजकारणराष्ट्रिय

…आणि केंद्राची परवानगी न घेताच जगातील सर्वात उंचावरील हवाईपट्टीवर उतरलं भारतीय एअरफोर्सचं विमान

लडाखजवळच्या सीमेवर भारत आणि चीनमधील संबंध दिवसोंदिवस कमालीचे तणावपूर्ण होत आहेत. याच पार्श्वभूमीवर पूर्व लडाखमधील दौलत बेग ओल्डी (डीबीओ) हवाईपट्टी सध्या चीनशी सुरू असलेल्या वादामध्ये भारताकडून वापरली जात आहे. जगातील सर्वात उंचीवरील हवाईपट्टी असणारी डीबीओ हवाईपट्टी ही भारतीय वायुसेनेने (आयएएफ) २००८ साली मे महिन्यामध्ये केंद्राकडून लेखी परवानगी न घेता पुन्हा सुरू केली होती, अशी माहिती माजी व्हाइस चीफ एअर मार्शल (निवृत्त) प्रणव कुमार बारबोरा यांनी दिली आहे. 

१६ हजार ८०० फूटांपेक्षा जास्त उंचीवरील सर्वात प्रगत लँडिंग सेवा असणाऱ्या पाठारी भागांमध्ये डीबीओ हवाईपट्टीचा समावेश होतो. या ठिकाणी एएन -३२ आणि सी -१३० सारखे सुपर हरक्यूलिस विमाने सहज लँडिंग करु शकतात.

“ही हवाईपट्टी पुन्हा सक्रिय करण्याबाबत आयएएफने केंद्राला लेखी स्वरुपात कोणतीही कल्पना दिलेली नव्हती. त्यामुळेच लँडिंग झाल्यानंतर आणि तेथून विमाने परत आल्यानंतरच सरकारला योग्य ती महिती पुरवण्यात आली,” असं निवृत्त व्हाइस चीफ एअर मार्शल बारबोरा यांनी सांगितलं. केंद्राच्या प्रतिक्रियेबद्दल विचारले असता बारबोरा यांनी,  “तुम्ही असं का केलं? असा प्रश्ना आम्हाला सरकारने विचारला. त्यावेळी आम्ही सैनिकांची रसद पुरवणे ही वायुसेनेची जबाबदारी असल्याचे सांगितले होते,” असं उत्तर दिल्याचे स्पष्ट केलं.

ही हवाईपट्टी पुन्हा कार्यान्वित झाली त्यानंतर चीनने यासंदर्भात फ्लॅग मिटींगची मागणी केली. भारतानेही या चर्चेसाठी सकारात्मक प्रतिसाद दिला. मात्र नंतर चीनकडून यासंदर्भात काहीच पुढाकार घेण्यात आला नाही असं बारबोरा यांनी सांगितलं.

तत्कालीन संरक्षणमंत्री ए. के. अँटनी यांनी त्यांना चीनच्या भेटीदरम्यान त्याबद्दल प्रश्न विचारल्यास त्यांना काय सांगू असं आपल्याला विचारलं होतं अशी आठवणही बारबोरा यांनी सांगितली. भूकंपग्रस्तांना मदत पुरवण्यासाठी अँटनी चीन दौऱ्यावर गेले होते. मात्र या भेटीदरम्यान तसेच त्यानंतही चीनने हा मुद्दा कधीच उपस्थितच केला नाही असंही बारबोरा सांगतात.

१९६५ च्या युद्धानंतर डीबीओची हवाईपट्टी पुन्हा वापरता आणण्याचा प्रस्ताव नाकारण्यात आल्याची माहिती बारबोरा यांनी दिली. “४३ वर्षानंतरही या हवाईपट्टीचा वापर करण्यासाठी होकार दिला जात नव्हता. त्यासाठी अनेक कारणं देत कायम नकारच दिला जायचा,” असं बारबोरा यांनी एएनआयशी बोलताना सांगितलं. अखेर २००८ साली बारबोरा यांनीच एएन-३२ या मालवाहू विमानासह येथे लॅण्डींग केलं. यासंदर्भात कोणालाही माहिती देण्यात आलेली नव्हती हे एखाद्या गुप्त मोहिमेसारखं होतं.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button