Uncategorizedताज्या घडामोडीमहाराष्ट्र

फक्त एका बियरसाठी फोडले वाईन शॉप

बुलडाणा : ‘पापी पेट का सवाल हे भाई’ जेव्हा आपल्याला आपली व्यथा मांडायची असते तेव्हा आपण सहसा म्हणून जातो पण जेव्हा चक्क एका बियरच्या शाॅपमधून चोरट्यने फक्त एक बिअरची बाटली चोरली तर याला काय म्हणावे?. असाच काहीसा प्रकार बुलडाण्यातील एका वाईन शॉपच्या सीसीटीव्हीत कैद झाला आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर तुफान व्हायरल होत आहे.

बुलडाणा जिल्ह्यात गेल्या अनेक महिन्यांपासून चोरीचे सत्र कायम असून आता तर चोरट्यांनी चांगलाच धुडगूस घातला आहे. बुलडाणा शहरात १९ जुलैच्या एकाच रात्रीत चार ठिकाणी चोरी झाली. तर त्यापैकी एका वाईन शाॅपमध्ये मध्ये चोरी करून फक्त एक बियरची बाॅटल चोरी करण्यात आली. हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीत मध्ये कैद झाला आहे. बुलडाणा शहरातील भगवती कॉम्प्लेक्स मधील नवरंग जनरल स्टोअर्स, शंकर बूक डेपो, लाठे किराणा ही दुकाने रात्री २ वाजेच्या सुमारास फोडली आहे.या तीन दुकानात मधून शटर वाकवून रोख रक्कम आणि शटरचे नुकसान केले. त्यानंतर या चोरट्यांनी आपला मोर्चा संगम चौकातील रूचा वाइन शॉपवर वळवला. विशेष बाब म्हणजे या चोरीत फक्त चोरट्यांनी शटर वाकवून फक्त चक्क एक बियरची बॉटल चोरून चोरटे फरार झाले. या चोरीची आता सर्वत्र चर्चा सुरू आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button