breaking-newsताज्या घडामोडीमनोरंजन

#CoronaVirus : करोनामुळे अमेरिकेत घरात बंद शाहरुखची मुलगी

न्यूयॉर्क | शाहरुख खानची मुलगी सुहाना खानने नुकतंच तिचं इन्स्टाग्राम अकाउंट पब्लिक केलं. याच आठवड्यात सुहाना खानच्या अकाउंटवर ब्ल्यू टीकही आली. सुहानाचे अनेक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. नुकतेच आता तिचे करोनाशी निगडीत काही फोटो व्हायरल होत आहेत. सध्या सुहाना न्यूयॉर्क युनिव्हर्सिटीमध्ये अभिनय आणि सिनेमांचं शिक्षण घेत आहे. तिथल्या मित्र- मैत्रिणींसोबत ती धम्माल मस्ती करताना दिसते.

नुकतेच सुहानाने तिच्या वेगवेगळ्या मूडचे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. तिने काळ्या रंगाचं स्वेटशर्ट घातलं आहे. असं वाटतं की करोना विषाणूमुळे अमेरिकेत सुरू झालेल्या आणीबाणीमुळे ती घरातून बाहेर पडत नाही आणि घरात बसून ती कंटाळली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button