breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडराजकारण

बालजत्रेला उत्स्फुर्त प्रतिसाद, गडकिल्ले स्पर्धेचे बक्षीस वितरण

पिंपरी |

पिंपरी-चिंचवड शहर युवा सेना व विश्वजीत बारणे यांच्या सहकार्यातून बालदिनानिमित्त थेरगाव येथे आयोजित बालजत्रा, खाऊगल्ली, मनोरंजन कार्यक्रमाला मोठा प्रतिसाद मिळाला. परिसरातील मुले मोठ्या संख्येने जत्रेत सहभागी झाले होते. त्याचबरोबर दिवाळीनिमित्त घेण्यात आलेल्या गडकिल्ले स्पर्धेचे बक्षीस वितरण करण्यात आले. शिवसेना संपर्कप्रमुख, माजी राज्यमंत्री सचिन अहिर यांच्या हस्ते थेरगावात झालेल्या बालजत्रेचे उद्घाटन झाले. गडकिल्ले स्पर्धेचे बक्षीस वितरणही त्यांच्या हस्ते झाले. मावळचे खासदार श्रीरंग बारणे, युवासेना प्रमुख विश्वजीत बारणे, युवा विस्तार अधिकारी राजेश पळसकर, शहरप्रमुख सचिन भोसले, महिला संघटिका उर्मिला काळभोर, युवा सेनेचे अनिकेत घुले, रूपेश कदम, विजय साने, दिपक गुजर आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

माजी मंत्री अहिर, खासदार बारणे यांनी बालदिनानिमित्त बालकांना शुभेच्छा दिल्या. मुलांच्या मनोरंजनासाठी जत्रेचे आयोजन केल्याबद्दल युवा सेनेचे कौतुक केले. दिवाळीनिमित्त सम्राट मित्र मंडळातर्फे आयोजित केलेल्या भव्य गडकिल्ले स्पर्धेला मोठा प्रतिसाद मिळाला. सोहम पांडे, गौतम गायकवाड आणि प्रथमेश हकाठे यांनी मुरुड जंजिरा किल्ला साकारला. त्यांचा पहिला क्रमांक आला. विश्वराज फंड, श्रेया फंड आणि यश कुंभार यांनी राजगड किल्ला साकारला. त्यांचा द्वितीय क्रमांक आला. तर, अतिश खरसडे, तन्मय भोसले, संभव कटारिया, सनी बंजारा आणि इरशाद शेख यांनी तोरणा किल्ला साकारला. त्यांचा तृतीय क्रमांक आला. 10 जणांना उत्तेजनार्थ बक्षीस देण्यात आले. स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्वांचा प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आल्याचे युवासेना प्रमुख विश्वजीत बारणे यांनी सांगितले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button