breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

#CoronaVirus | आता पाच मिनिटात येणार कोरोना व्हायरसचा रिपोर्ट

नवी दिल्ली | कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वेगात पसरत आहे. हे टाळण्यासाठी अमेरिकन प्रयोगशाळेत एक किट विकसित करण्यात आले आहे. या किटच्या मदतीने कोरोना चाचणी अत्यंत कमी कालावधीत होणार आहे. अ‍ॅबॉट लॅबोरेटरीजने हे किट विकसित केले असून फूड अ‍ॅण्ड ड्रग्स असोसिएशन ऑफ अमेरिका (एफडीए) ने या किटला मान्यता दिली आहे.

या किटचे वैशिष्ट म्हणजे हे किट अत्यंत लहान असून एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेणे अतिशय सोपं आहे. प्रायोगित तत्वावर याची चाचणी घेण्यात आली आहे. कोरोना विषाणू जगभरात वेगाने पसरत आहे. त्यामुळे जास्तीत जास्त लोकांच्या कोरोना चाचणी करुन या साखळीला तोडणे फार आवश्यक आहे. मात्र, सध्या उपलब्ध असलेल्या कोरोना चाचणी किटचा रिझल्ट यायला पाच ते सहा तास लागतात. त्यामुळे कोरोनाची साखळी तोडण्याला विलंब लागत आहे. या पार्श्वभूमीवर अमेरिकेच्या अ‍ॅबॉट लॅबोरेटरीजने संशोधन करुन एक किट विकसित केलं आहे.

या किटच्या मदतीने कोरोनाची पॉझिटिव्ह चाचणी अवघ्या पाच मिनिटांत समजणार आहे. तर, निगेटिव्ह चाचणीला 13 मिनिटांचा अवधी लागणार आहे. कंपनीचे अध्यक्ष रॉबर्ट फोर्ड म्हणाले, वेगाने परिणाम दाखवणारे हे कोरोना चाचणी किट या संकटात क्रांतीकारी ठरणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button