ताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबई

‘बेस्ट’मध्ये पुन्हा यंत्राद्वारे तिकीट

गोराई, मागाठाणे व वडाळा आगारातील वाहकांना यंत्रांचे वाटप

बेस्टमधील बंद पडलेली ई-टिकिटिंग म्हणजेच ‘ट्रायमॅक्स’ या यंत्राद्वारे तिकिटे देण्याची सेवा पुन्हा सुरू करण्यात येत आहे. गोराई, मागाठाणे या पाठोपाठ आता वडाळा आगारातील वाहकांना ही यंत्रे देण्यात आली आहेत. नादुरुस्त झालेली ट्रायमॅक्स यंत्रेच दुरुस्ती करून पुन्हा वापरात आणली जाणार आहेत.

बेस्टमध्ये २०१० पासून ई-तिकीट सेवा सुरू करण्यासाठी ‘ट्रायमॅक्स आयटी इन्फ्रास्ट्रक्चर अ‍ॅण्ड सव्‍‌र्हिस’ कंपनीशी करार करण्यात आला होता. त्या आधी तिकिटावर चिमटय़ाने खूण करून ते तिकीेट प्रवाशांना दिले जाई. परंतु नव्याने आलेल्या ट्रायमॅक्स यंत्रांमध्ये वारंवार बिघाड होत असल्याने ती हाताळताना वाहकांना अडचणी येऊ लागल्या होत्या. बंद यंत्रांमुळे तिकीट देता येत नसल्याने प्रवासी व वाहक यांच्यात खटके उडत होते. कंत्राट संपल्यानंतर ई-तिकिटिंगकरिता कोणीही सेवा देण्यास पुढे न आल्याने ट्रायमॅक्सलाच पुन्हा कंत्राट देण्यात आले.

बेस्टमध्ये ट्रायमॅक्सची ९ हजार ५०८ यंत्रे आहेत. त्यातली बहुतांश नादुरुस्तच झाल्याने या यंत्रांचा वापर बंद करण्यात आला आणि बेस्टने पुन्हा एकदा जुन्या ‘टिकटिक’ तंत्राद्वारे तिकीट देण्यास सुरुवात केली.

काही केंद्रांवर ट्रायमॅक्सद्वारे तिकीट

काही आगारांत या यंत्राच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले होते. त्यानुसार गोराई, मजास, मागाठणे, मालवणी, मरोळमधील यंत्रे दुरुस्त करून ती वापरात आणली गेली आहेत. आता वडाळा आगारातही ही यंत्रे वापरात आणली जाणार आहेत. लांब पल्ल्याच्या मार्गावर प्रामुख्याने ही यंत्रे वापरली जात आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button