breaking-newsमुंबईराजकारण

हे शहाणपण आधी सुचलं नाही का? नवाब मलिकांचा मुनगटीवारांना टोला

मुंबई | महाईन्यूज

भाजपाचे नेते आणि माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी शिवसेनेने प्रस्ताव दिला तर भाजपा सत्तास्थापनेसाठी तयार असल्याचं वक्तव्य केलं आहे. यावरून आता काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून त्यांच्या या वक्तव्याचा समाचार घेण्यात येत आहे. हे शहाणपण आधी सुचलं नाही का? असं म्हणत अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी मुनगंटीवारांवर हल्लाबोल केला आहे.

तर सुधीर मुनगंटीवार यांना ‘मुंगेरीलाल के हसीन सपने’ पडत आहेत, असं म्हणत सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी टोला हाणला. “भाजपाची इच्छा आहे, परंतु शिवसेना त्यांच्यासोबत जाईल की नाही हे शिवसेनेला विचारलं पाहिजे,” असं मलिक म्हणाले. एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली. “हे शहाणपण यापूर्वी का सुचलं नाही? असं म्हणते भाजपा सत्तेशिवाय राहू शकत नसल्याचं मलिक म्हणाले. मी येतो अशी भाजपाची इच्छा आहे. त्यांना सोबत घ्यायचं की नाही हा निर्णय शिवसेनेचा आहे,” असं ते म्हणाले. तसंच शिवसेनेनं कमळाबाईला सोडलं आहे, असंही त्यांनी नमूद केलं आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button