breaking-newsराष्ट्रिय

#CoronaVirus:देशभरात 3.54 लाखांवर कोरोनाबाधित

नवी दिल्ली :  देशभरात जीवघेण्या कोरोना व्हायरसचं संकट दिवसेंदिवस गडद होत चाललं आहे. भारतातील कोरोना बळींची संख्या 11 हजारांपेक्षा जास्त झाली आहे. काल एकूण 2003 मृत्यूंची नोंद झाली. महाराष्ट्राने काल यापूर्वीच्या 1328 मृत्यूंची तर दिल्लीने 344 मृत्यूंची नोंद केल्याने देशातील मृतांच्या आकड्यात मोठी वाढ झाली आहे. गेल्या 24 तासात कोरोनाबाधितांच्या संख्येत 24 तासात 10 हजार 974 ने वाढ झाली तर 331 लोकांचा कोरोनाने बळी घेतला आहे. देशभरात आजपर्यंत कोरोनामुळं 11903 लोकांचा मृत्यू झाला आहे.

दरम्यान, देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 3 लाख 54 हजार 065 वर गेला आहे. त्यापैकी एकूण 1 लाख 86 हजार 935 रुग्ण बरे झाले आहेत. म्हणजे देशाचा रिकव्हरी रेट 52.79टक्के झाला आहे. देशात सध्या कोरोनाची लागण असलेले रुग्ण 1 लाख 55 हजार 227 इतके आहेत. गेल्या 24 तासांत 6 हजार 922 रुग्ण बरे झाले तर 331 मृत्यूमुखी पडले आहेत. देशात 3 तारखेला अनलॉक झाल्यापासून कोरोनाबाधितांच्या संख्येत 1 लाख 46 हजार 450 ची वाढ झाली आहे तर मृतांची संख्या 4 हजार 416 ने वाढली आहे.

महाराष्ट्रात काल 1802 कोरोनाबाधित रुग्णांना यशस्वी उपचारांनंतर घरी सोडण्यात आलंय. दिलासादायक बाब म्हणजे आतापर्यंत राज्यभरात 57 हजार 851 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. रुग्ण बरे होण्याचा वेग राज्यात वाढताना दिसत आहे. काल कोरोनाच्या 2701 नव्या रुग्णांची नोंद झाल्याने राज्यातील कोरोना बाधितांचा आकडा 1 लाख 13 हजार 445 इतका झाला आहे. पैकी सध्या 50 हजार 44 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button