breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

कल्याणकारी योजनांचे अर्ज करण्यास मुदतवाढ द्या, नगरसेविका शर्मिला बाबर यांची मागणी

पिंपरी / महाईन्यूज

पिंपरी-चिंचवड महापालिका नागरवस्ती विकास योजना विभागाअंतर्गत, महिला बालकल्याण, मागासवर्गीय, अपंग कल्याणकारी व इतर योजनांसाठी लाभार्थ्यांकडून अर्ज मागविण्यात आले होते. या योजनांसाठी अर्ज वाटप व स्वीकृतीसाठी 26 ऑक्टोबर ते 25 नोव्हेंबर 2020 मुदत देण्यात आली होती. ही मदत वाढविण्यात यावी, अशी मागणी नगरसेविका शर्मिला बाबर यांनी केली आहे.

यासंदर्भात बाबर यांनी आयुक्त श्रावण हर्डीकर यांना निवेदन दिले आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, महापालिकेने कल्याणकारी योजनांसाठी अर्ज करण्याची दिलेली मुदत बुधवारी संपली असून आणखी असंख्य लाभार्थी या योजनांचे अर्ज भरण्यापासून वंचित आहेत. शिष्यवृत्ती, अर्थसहाय्याच्या योजनांसाठी असंख्य कागदपत्रे लाभार्थ्यांना जमा करावी लागतात. कोरोना विषाणुच्या प्रादुर्भावामुळे अनेक विद्यार्थी, लाभार्थ्यांना आवश्यक प्रमाणपत्रे, कागदपत्रे जमा करण्यात अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे त्यांना अर्ज भरता आलेले नाहीत.

महानगरपालिकेच्या वतीने राबविण्यात येणा-या लोककल्याणकारी योजनांपासून कोणी वंचित राहू नये. ही आपली जबाबदारी आहे. तरी महापालिकेने कल्याणकारी योजनांचे अर्ज करण्यासाठी आणखी महिनाभर मुदतवाढ द्यावी, अशी माहिती नगरसेविका बाबर यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button