breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

खून प्रकरण : ‘त्या’ तरूणीचे फोटो सोशल मिडियावर व्हायरल केल्याप्रकरणी १८ जणांच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल

पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी

एका खून प्रकरणाशी संबंधित असलेल्या तरुणीचे फोटो सोशल मिडियावर व्हायरल करण्यात आले. याप्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात १८ जणांच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशा प्रकारे सोशल मिडियावर बदनामी करणारे मेसेज, फोटो कोणी पोस्ट करू नये, असे आवाहन पोलीस आयुक्‍त विनायक ढाकणे यांनी केले आहे.

1) @shohebshaikh007, 2) @mr-balhu358, 3) user33494780 @mr, 4)@sidhart-sneha2, 5)@–mansi-2112, 6)@Shubhangi- sirsat, 7)@mr.shinchan- aadesh, 8)@swaranjali –199 9)deepalikamble358 10)@meghrajkambl e84 11)@son-of- bhimrao358 12)@rohitohol– 302 13)@sandyrodesr 14)@shubhamsada warte8 15)@balumore358 16)@sheetal-358 17)@amolgadve00 18)@jivan259 असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपींचे सोशल मिडियावरील युजर आयडी आहेत. याबाबत २४ वर्षीय तरूणीने मंगळवारी (दि.१६) सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

काही दिवसांपूर्वी सांगवी पोलीस ठाण्याच्या हद्दीत खूनाची घटना घडली होती. या गुन्ह्याशी संबंधित असलेल्या एका तरुणीचे फोटो आणि जातीय तणाव निर्माण होईल, अशा पोस्ट सोशल मिडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल करण्यात आल्या आहेत. आता या प्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा तपास वाकड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक डॉ. विवेक मुगळीकर यांच्याकडे देण्यात आला आहे.

कोणीही सोशल मिडियाच्या माध्यमातून एखाद्याची बदनामी होईल, असे मेसेज टाकू नये. धार्मिक तसेच जातीय तेढ निर्माण होईल, अशी वक्‍तव्य किंवा व्हिडिओ टाकू नये. सध्या सोशल मिडियावर पिंपरी चिंचवड सायबर सेलचे बारीक लक्ष आहे. अशा प्रकारची पोस्ट फेसबुक, व्हॉटस्‌ऍप, टिकटॉक, इन्टाग्राम, व्टिटर किंवा इतर कोणत्याही ठिकाणी आढळून आल्यास संबंधितांवर कडक कारवाई केली जाईल, असा इशारा पोलीस उपायुक्‍त विनायक ढाकणे यांनी दिला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button