ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडमहाराष्ट्र

उर्जा साक्षरतेसाठी संत साई शाळेत बसवले क्लायमेट क्लॉक!

वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीच्या एमआयटी कॉलेजमध्ये आयोजित केलेल्या क्लायमेट क्लॉक असेंब्ली आणि डिस्प्ले कार्यक्रमा मध्ये सहभागी होवून दमदार प्रदर्शन

भोसरी : भोसरी येथील संत साई हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीच्या एमआयटी कॉलेजमध्ये आयोजित केलेल्या क्लायमेट क्लॉक असेंब्ली आणि डिस्प्ले कार्यक्रमा मध्ये सहभागी होवून दमदार प्रदर्शन केले. संत साई शाळेच्या आवारात हवामानाचा अंदाज वर्तवणाऱ्या क्लायमेट क्लॉक बसवून उर्जा साक्षरतेसाठी पुढाकार घेतला आहे.

या प्रदर्शनामध्ये विक्रम विष्णोई, कृष्णा पगडे, सर्वेश पारगावकर,विनित गादिया, आदित्य भुजबळ हे विद्यार्थी आणि मार्गदर्शक शिक्षक प्रमोद शिंदे सहभागी झाले होते. संत साई शाळा हि ९०% ऊर्जा साक्षर होणारी हि पिंपरी चिंचवड मधील हि पहिलीच शाळा आहे. विद्यार्थ्यांना कार्य यशस्वी करण्यासाठी प्राचार्य शिवलिंग ढवळेश्वर यांच्याकडून प्रेरणा तर सर्व शिक्षकांचे मार्गदर्शन मिळाले. प्राचार्य प्रा ढवळेश्वर म्हणाले कि, भविष्यात जागतिक तापमान वाढीच्या संकटाला सामोरे जावे लागणार आहे. यासाठी आपण दैनंदिन जीवनशैली करून नागरीकांना ऊर्जा साक्षर बनवणे गरजेचे आहे.आमच्या
विद्यार्थ्यांनी हवामान घड्याळाचे सुटे पार्ट एकत्रित करून एक हवामानाचा अंदाज वर्तवणारे घड्याळ बनवले.आणि ते घड्याळ आज आमच्या शाळेत बसवले आहे. हे घड्याळ भविष्यात किती वातावरणात किती घातक घटक आहे. किती धोकादायक किती वर्षे असेल , यासंदर्भात माहिती देते.नागरीक ऊर्जा साक्षरता असेल तर हवामानातील बदल कमी करण्यासाठी हे टाकलेले पहिले पाऊल आहे. सुरुवात आमच्या शाळेपासून करीत आहोत.

आजपासून पुढील पाच वर्षांमध्ये आपण ग्लोबल वार्मिंगला थांबवण्यासाठी प्रयत्न केला नाही तर, पृथ्वीचे तापमान हे दीड डिग्रीपर्यंत वाढू शकते. संपूर्ण मानव जातीला त्याचा मोठा धोका होऊ शकतो. शेतीमधून अन्नधान्य मिळणेच बंद झाले तर? म्हणूनच उपाय करण्यासाठी आयआयटी मुंबईचे प्रा चेतन सोलंकी यांची क्लायमेट क्लॉक मोहीम शाळेत सुरू केली आहे.

यासाठी आयआयटी मुंबईचे डॉ चेतन सोलंकी,राकेश मल्लिक या तज्ञांचे मार्गदर्शन आणि एनर्जी स्वराज आणि एक्सलन्ट सोल एनर्जी या संस्थांची मदत होत आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button