breaking-newsताज्या घडामोडीपश्चिम महाराष्ट्र

सांगलीत सात आमदार, माजी खासदार पॉझिटिव्ह

सांगली – सांगली जिल्ह्यात कोरोनाचा समूह संसर्ग सुरू झाला आहे. दिवसेंदिवस रुग्णसंख्या वाढत असल्याने संकट अधिकच गडद होत असताना जिल्ह्यातील राजकीय नेत्यांमध्येही कोरोनाचा विळखा घट्ट होत आहे. सांगली जिल्ह्यात आतापर्यंत सात आमदारांना कोरोनाची लागण झाली असून, त्यापैकी दोन आमदार कोरोनामुक्त झालेत. तर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक आणि अन्य शासकीय विभागातील अधिकारी कर्मचारी यांचे रिपोर्ट पण पॉझिटिव्ह आले आहेत. सांगली जिल्ह्यात मार्च महिन्यामध्ये कोरोनाचा शिरकाव झाला, त्या काळात युद्धपातळीवर उपाययोजना राबवून जिल्हा कोरोनामुक्त सुद्धा झाला होता. मात्र पुन्हा, कोरोनाने री-एन्ट्री केल्याने जिल्ह्याची परिस्थिती गंभीर झाली आहे.

जिह्यातील सात आमदार, तीन माजी आमदार, एक माजी खासदार असे डझनभर नेते कोरोनाबाधित झाले आहेत.

जिह्यात सुरेश खाडे, सुधीर गाडगीळ, अनिल बाबर, विक्रम सावंत, मोहनराव कदम, सदाभाऊ खोत, सुमन पाटील हे सात आमदार कोरोनाबाधित झाले आहेत. याशिवाय माजी खासदार राजू शेट्टी, माजी आमदार संभाजी पवार, नितीन शिंदे, राजेंद्र अण्णा देशमुख, काँग्रेस नेत्या जयश्रीताई पाटील, काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील, राष्ट्रवादीचे युवा नेते रोहित आर. आर. पाटील हेसुद्धा बाधित झाले आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button