breaking-newsताज्या घडामोडी

एखाद्या शोधाबद्दल दिला जाणारा अधिकार म्हणजेच ‘पेटंट’ नेमकं काय आहे?

Patent Rights In India : एखाद्याने जर एखादा नवीन शोध लावला आणि तो संबंधित शोध लावणाऱ्याला सरकारकडून मिळालेला अधिकार म्हणजेच पेटंट होय. पेटंटचा अर्थ असा होतो की सरकारने त्या शोधला अधिकृत मान्यता दिली आहे. आणि तो संबंधित शोध संबंधित व्यक्तीच्या नावे रजिस्टर झाला आहे. इंग्रजीमध्ये शोधाला INVENTION असे म्हटले जाते, तर या शब्दाचाच समानार्थी शब्द म्हणून पेटंट हा शब्द वापरला जातो.

तुमच्या माहितीसाठी म्हणून पेटंटसाठी एक कायदादेखील मंजूर झालेला आहे. हा कायदा खूप जुना असून आता जागतिक बाजाराच्या चढ उतारामुळे ज्या त्या देशांनी यात त्यांच्या सोयीनुसार बदल करून घेतले आहेत. मात्र पेटंटच्या संबंधित कायद्यात असणाऱ्या दोन्ही प्रकारांत जुने आणि नवीन पेटंट घेण्याच्या कायद्यात काही नवीन असावे आणि ही सर्व प्रक्रिया इतर कोणालाही माहित नसावी अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. पूर्वी जो पेटंट कायदा लागू करण्यात आला होता, त्या कायद्यात प्रोडक्ट्च पेटंट नव्हतं तर प्रोसेस संदर्भात पेटंट दिलं जात होतं. याचाच अर्थ तुमचे एखादे उत्पादन असेल तर तुम्हाला त्या उत्पादनाचे पेटंट मिळत नव्हते तर त्याच्या प्रक्रियेचे पेटंट दिले जात होते. त्याचाच फायदा म्हणा किंवा गैरफायदा घेऊन इतर कंपन्याही उत्पादनाच्या प्रक्रियेत बदल करून तसेच उत्पादन बनवत होत्या, परिणामी यामुळे ज्याच्या नावावर पेटंट आहे त्या व्यक्तीने मोठे नुकसान होतं होते. हीच बाब लक्षात घेता पेटंट कायद्यात मोठा बदल करण्यात आला आणि त्या उत्पादनाचे पेटंट करण्याचा कायदा अस्थित्वात आला. हाच नवीन पेटंट कायदा आपल्याकडे लागू होण्यापूर्वी परदेशातील किमतीच्या एक दशांशहून कमी किमतीत औषधे आपल्याला मिळत असत.

हेही वाचा – ७० वर्षे आमचं झालेलं नुकसान सरकार कसं भरून काढणार? मनोज जरांगेंचा सरकारला सवाल 

पेटंट रजिस्टर करण्यासाठी कायद्याने काही अटी घालून दिलेल्या आहेत. त्यानुसार पेटंट हे नाविन्यपूर्ण असण्याची अट आहे. तशीच पेटंट हे सामान्यज्ञान या प्रकारात मोडणे नाही पाहिजे ही अटही ठेवण्यात आली आहे. महत्वाचं म्हणजे हे सामान्यज्ञान ज्यांना या पेटंटचा उपयोग होणार आहे अशांच्या बाबतीतच लागू होते. कोणताही व्यवसाय असो वा छोटा मोठा धंदा प्रत्येकामध्ये काही गोष्टी सामान्यज्ञान स्वरूपात पाहायला मिळतात. याच्या बाबतीत इतर लोकांना ज्ञान असू शकत नाही. जसे की ओळंबा म्हणजे काय हे आपल्यापैकी बऱ्याच लोकांना माहित नसेल मात्र गवंड्याला ते माहीत असेल, कारण हे त्याच्या कामाशी निगडित आहे, त्यामुळे इतरांना त्याचे ज्ञान नसू शकते.

पेटंटसंदर्भात अनेक कायदे करण्यात आले आहेत. त्यानुसार एखादे पेटंट दिले आणि नंतर ते सामान्यज्ञान प्रकारात येते असे लक्षात आल्या किंवा सिद्ध झाल्यास ते रद्द देखील केले जाते. याचेच उदाहरण द्यायचे झाले तर अमेरिकेत एका कंपनीला हळदीचे पेटंट दिले गेले होते. तसेच हळदीचा वापर भारतात हजारो वर्षांपासून औषध म्हणून केला जात आहे. याचेच दाखले देऊन अमेरिकेतील एका कंपनीला दिलेले हळदीचे पेटंट रद्द करण्यात भारतीय शास्त्रज्ञांना यश आले आहे. अशा प्रकारे एखाद्या गोष्टीचा अथवा वस्तूचा वापर विशिष्ट प्रक्रियेसाठी व कार्यासाठी पहिलेपासून होत असल्यास त्यासंदर्भात पेटंट देता येत नाही अथवा असे पेटंट दिले गेले असल्यास कायद्याचा पुरेपूर अभ्यास करून असे पेटंट रद्द केले जाते.

पेटंटचा अधिकार देताना कायद्याने काही अटी ठेवल्या आहेत. त्यातील प्रमुख अट म्हणजे ज्या वस्तूचे अथवा गोष्टीचे पेटंट मिळवायचे आहे ती वस्तू समाजासाठी आठ नागरिकांसाठी उपयोगाची असावी, तसेच त्यापासून कुठे तरी काही तरी आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता असावी, मात्र त्यापासून लाभ मिळालाच पाहिजे असे काही नाहीये. कारण पेटंट दिले गेल्यानंतर किंवा अन्य कोणत्याही शोधामुळे अथवा घटकामुळे पेटंट वापराने फायद्याचे ठरू शकत नाही, अशी परिस्तिथी निर्माण होऊ शकते. थोडक्यात सांगायचं झालं तर एखाद्या वास्तूचे तुम्हाला पेटंट मिळवायचे असल्यास त्याचा कमर्शियल वापर करता येत असेल तरच पेटंट दिले जाते, याव्यतीरिक्त पेटंट दिले जात नाही. पेटंट मिळवायचे असल्यास महत्वाचा भाग म्हणजे पेटंट मिळवण्यासाठी केला जाणारा अर्ज. या अर्जावरूनच ठरवले जाते की तुम्हाला पेटंट द्यायचे की नाही. पेटंटसाठी तुम्ही भरत असलेल्या अर्जात तपशीलवार, तर्कसंगत आणि अगदी योग्य शब्दप्रयोग असावे लागतात. अशा प्रकारे तुमचा अर्ज नसेल किंवा तुमचा अर्ज चुकीच्या शब्दांत असेल तर तुमचा पेटंटसाठी केलेला अर्ज नाकारला जाऊ शकतो.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button