breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंच्या संपत्तीबाबत मोठा गौप्यस्फोट; म्हणाले..

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. यूटी असा उल्लेख करत ते लंडनला येतात, मोठमोठ्या संपत्ती घेतात आणि थंडगार हवा खातात असं ऋषी सुनक यांनी सांगितल्याचा दावा एकनाथ शिंदेंनी केला.

एकनाथ शिंदे म्हणाले, आपला देश महासत्तेकडे चालला आहे. आज आपल्या देशाचं नाव लोक अभिमानाने घेऊ लागले आहेत, मग यांना पोटदुखी का असावी. काही करार केले त्यामुळे आपल्या देशात मोठ्या प्रमाणात उद्योग येतील. आपल्याला नोकऱ्या मिळतील, स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी काम मिळेल. मग याची पोटदुखी का? उलट याचं स्वागत करायला पाहिजे. यांचं सरकार गेल्यावर त्यांना विश्वास नाही की, सरकार गेलंय की, राहिलं. त्यांच्या मनावरचा ताबा गेलाय. त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. म्हणून ते काहीही बोलू लागले आहेत.

हेही वाचा – सर्वसामान्य जनतेला आणखी एक धक्का, तूरडाळ आणि तांदूळ महागला!

मी ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांना भेटलो. ते आपल्या भारतातील जुने नागरिक. त्यांना महाराष्ट्राचा मुख्यमंत्री भेटला आणि मलाही आपला माणूस इंग्लंडचा पंतप्रधान झाला याचा अभिमान होता. काही लोकांनी त्यावर टीका केली. काय भेटले, कसे भेटले, काय बोलले, कुठल्या भाषेत बोलले याला काय अर्थ आहे. मी त्यावर बोलणार नव्हतो, पण त्यांनी विचारलं म्हणून मी मुद्दाम सांगतो, असं एकनाथ शिंदे म्हणाले.

ऋषी सुनक यांनी मला विचारलं की, यूटी कसे आहेत. त्यावर मी विचारलं का? तर ते म्हणाले की, ते दरवर्षी लंडनला येतात. मोठ्यामोठ्या संपत्ती घेतात, थंडगार हवा खातात. त्यांची खूप माहिती माझ्याकडे आहे. तुम्ही एकदा लंडनला आलात की, मी सगळं सांगतो, असं एकनाथ शिंदे म्हणाले. यूटी म्हणजे काय हे तुम्हाला माहिती आहे का असं मुख्यमंत्री म्हणाले. यावर उपस्थितांनी उद्धव ठाकरे असं म्हटलं. मी एवढंच सांगतो की, आम्हाला सगळं माहिती आहे. आमच्यावर बोलण्याची वेळ येऊ देऊ नका. अन्यथा पाटणकर काढा घेण्याची वेळ येईल, असंही एकनाथ शिंदे म्हणाले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button