breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपश्चिम महाराष्ट्रमहाराष्ट्र

आषाढी यात्रेसाठी विठ्ठल मंदिरास आकर्षक विद्युत रोषणाई

पंढरपूर – यंदा सलग दुसऱ्या वर्षी कोरोनामुळे आषाढी यात्रा भरणार नसली तरी विठ्ठल मंदिर मात्र विविधरंगी दिव्यांनी झगमगून निघाले आहे. आषाढीसाठी विठ्ठल मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. विठ्ठल मंदिराचे महाद्वार, रुक्मिणी द्वार, पश्चिम द्वार या प्रमुख प्रवेशाच्या ठिकाणी सुंदर रोषणाई केली आहे. याशिवाय संपूर्ण मंदिर परिसर, तुकाराम भवन, दर्शन मंडपदेखील या रोषणाईने उजळून गेला आहे. मंदिराच्या आतील बाजूसही रोषणाई करण्यात आली आहे. तसेच नामदेव पायरीजवळ अतिशय आकर्षक पद्धतीने एलईडी दिव्यांच्या माळा वापरून रोषणाई केली आहे. दिराची शिखरे आणि मंदिरावर विविध रंगांच्या दिव्यांचे फोकस मारण्यात आल्याने विठ्ठल मंदिराचे रुपडेच पालटले आहे. विठ्ठल सभामंडप या आकर्षक रोषणाईने झगमगू लागला आहे.

पुण्याच्या मुळशी तालुक्यातील शिवदत्त डेकोरेटर्स कंपनीचे मालक विनोद जाधव या भक्ताने सलग पाच दिवसांच्या अथक मेहनतीने विठूरायाची राऊळी आकर्षक विद्युत रोषणाईने उजळवून टाकली आहे. दरम्यान, आषाढी सोहळ्यासाठी वारकरी आणि भाविकांनी पंढरपुरात येऊ नये यासाठी प्रशासनाने जाहीर केलेल्या संचारबंदीत थोडी सुधारणा करण्यात आली असून आता १७ जुलैऐवजी १८ जुलैपासून संचारबंदी अंमलात येणार असून पंढरपूर शेजारील गोपाळपूर वगळता इतर ९ गावांची संचारबंदी २२ जुलै रोजी संपणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button