धीरेंद्र कृष्णशास्त्री यांचं दलित समाजाबद्दला वादग्रस्त विधान; म्हणाले..
Dhirendra Krishna Shastri : बागेश्वर धामचे धीरेंद्रकृष्ण शास्त्री यांनी दलित समाजाविषयी वादग्रस्त विधान केलं आहे. त्यांच्या वक्तव्यामुळे बसोर या दलित समुदायाचा अपमान झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. बसोर समाजाकडून अनुसूचित जाती आणि जनजाती अधिनियमांतर्गत पोलिसात तक्रार करण्यात आली आहे.
बागेश्वर धामचे पंडित धीरेंद्रशास्त्री या त्यांच्या दिव्य दरबारात युवकासह बोलत होते. बाबा बागेश्वर यांनी काढलेल्या एका चिठ्ठीवर या युवकाने आक्षेप घेतला. त्यावर बाबा बागेश्वर भडकले. त्यानंतर त्यांनी युवकाला आव्हान दिलं. त्यावेळी युवक म्हणाला की मी ब्राह्मण आहे. त्यावेळी बाबा म्हणाले मग मी काय बसोर आहे का? यानंतर हा युवक आणि बाबा यांच्यात बराच वाद झाला. धीरेंद्रशास्त्रींनी २ सप्टेंबरला हे वक्तव्य केलं होतं. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
हेही वाचा – मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंच्या संपत्तीबाबत मोठा गौप्यस्फोट; म्हणाले..
बीते दिनों राजस्थान के सीकर में बागेश्वर सरकार के दिव्य दरबार में धीरेन्द्र शास्त्री द्वारा बुंदेलखंड की बसोर समाज को जातिसूचक शब्द कहकर अपमानित किया है दलित जाति के अंतर्गत आने वाले बसोर समाज @BhimArmy_BEM से निवेदन करती है कि राष्ट्रीय स्तर पर इसका संज्ञान लेने का कष्ट करे। pic.twitter.com/ghAWAHuk4m
— Omnarayan Dhanuk BHIM ARMY (रावण) (@OmnarayanDhanuk) September 9, 2023
२ सप्टेंबरला धीरेंद्रशास्त्री हे सीकरमध्ये होते. त्यावेळी त्यांनी हे घटना घडली आहे. हा व्हिडीओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाल्यानंतर छतरपूरच्या दलित समाजाने पोलीस ठाण्यात धीरेंद्रशास्त्रींच्या विरोधात तक्रार नोंदवली आहे.