पिंपरी / चिंचवड

पिंपरी l प्रतिनिधी

घरासमोर दारू पीत बसलेल्या एका व्यक्तीने तरुणाला विनाकारण ‘तुझ्या घरात चपातीला तेल नसते. तू भाडेकरू आहे. एवढा रुबाब का दाखवतोय’ असे म्हणत दोघा भावांनी एका महिलेला आणि तिच्या दोन मुलांना मारहाण केली. तसेच महिलेचा विनयभंग केला. ही घटना 8 मे रोजी रात्री अकरा वाजता थेरगाव येथे घडली.

पीडित महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार सचिन आडसूळ (वय 35), राजेश आडसूळ (वय 28, दोघे रा. थेरगाव) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी सचिन हा घरासमोर दारू पीत बसला होता. त्याने विनाकारण फिर्यादी यांचा मोठा मुलगा अक्षय याला ‘ए भाडेकरू तुझ्या घरात चपातीला तेल नसते. तू भाडेकरू आहे. एवढा रुबाब का दाखवतोय’ असे म्हटले. त्यावरून अक्षय आणि आरोपी सचिन यांचे भांडण झाले. हे भांडण सोडविण्यासाठी फिर्यादी यांचा लहान मुलगा गौरव गेला. त्यावेळी आरोपी सचिन याने अक्षय आणि गौरव यांना मारहाण केली.

त्यानंतर फिर्यादी दोन्ही मुलांना घेऊन घरी गेल्या. अक्षय काही वेळाने पोलीस चौकीत तक्रार देण्यासाठी गेला. त्यावेळी आरोपी राजेश आला. सचिन आणि राजेश यांनी शिवीगाळ करून फिर्यादी यांना ‘तुझी पोरं कुठं आहेत. माझ्या भावाला दोघांनी मारले आहे. तू त्यांना घराबाहेर काढ.’ फिर्यादी यांनी नाही म्हटले असता आरोपी राजेश याने फिर्यादी यांना लाकडी काठीने मारहाण केली. त्यांच्याशी गैरवर्तन करून त्यांचा विनयभंग केला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button