स्वच्छ सर्वेक्षणअंतर्गत स्वच्छ स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन
पिंपरी, (महाईन्यूज) – स्वच्छ सर्वेक्षण 2020 अंतर्गत पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने स्वच्छता स्पर्धा घेण्यात येणार आहेत. त्यामध्ये सहभागी होणा-या हॉटेल्स, शाळा, हॉस्पीटल्स, गृहनिर्माण संस्था, मोहल्ला मार्केट, मंडई या गटांमध्ये स्पर्धेचे निकष ठरविण्यात येणार आहेत. त्यानुसार गुणांकन देण्यात येणार आहे.
या स्पर्धेत सहभागी होण्याकरिता विहित नमुन्यातील अर्ज भरावा लागणार आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या संकेतस्थळावर अर्ज उपलब्ध आहे. डाऊनलोड करून तो भरता येऊ शकतो. शिवाय, क्षेत्रीय कार्यालयांमध्ये देखील हे अर्ज देण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. अर्ज भरण्यासाठी 25 जून अंतिम मुदत देण्यात आली आहे.
स्पर्धेत सहभागी झाल्यानंतर हॉटेल्स, शाळा, हॉस्पीटल्स, गृहनिर्माण संस्था, मोहल्ला मार्केट, मंडई या सर्व अस्थापनांमार्फत परिसराची साफसफाई, शौचालयांची साफसफाई, देखभाल दुरूस्ती, ओला व सुका कचरा वर्गीकरण करणे आवश्यक आहे. अधिकाधिक संख्येने गुगल प्ले स्टोअरवरून स्वच्छ अप डाऊनलोड करणे आवश्यक आहे.