Breaking-newsराष्ट्रिय

ऑक्सफोर्डमध्ये कोरोना संसर्गावरील लसीवर यशस्वी संशोधन

नवी दिल्ली : कोविड-19 च्या लसीच्या प्राथमिक टप्प्यात मानवी चाचण्यांनंतर प्राणघातक कोरोनाव्हायरसपासून “दुहेरी संरक्षण” मिळण्याची शक्यता आहे. तसे परिणाम चाचण्यांतून दिसून आले आहेत. हे निष्कर्ष सोमवारी जाहीर केले जातील, असा अंदाज आहे. तरीही त्याबद्दलची माहिती मात्र प्रसारमाध्यमात आलेली आहे.

यूकेच्या स्वयंसेवकांच्या गटाकडून घेतलेल्या रक्ताच्या नमुन्यांमधून ही लस शरीरात प्रतिपिंडे (अँटीबॉडीज) आणि “किलर टी-सेल्स” तयार करण्यास मदत करते. या चाचणीतील एका ज्येष्ठ सदस्याने ‘द डेली टेलीग्राफ’ला ही माहिती दिली आहे.


ऑक्सफोर्डच्या संशोधनाबाबत आणखी एक सकारात्मक गोष्ट अशी आहे की या लसीच्या मानवी चाचणीचा तिसरा टप्पा यापुर्वीच सुरु झालाय. इंग्लंडबरोबरच आफ्रिका तसंच दक्षिण अमेरिकेत या लसीच्या हजारोंच्या संख्येत चाचण्या सुरु झाल्यात. ही चाचणीही यशस्वी झाल्यास लवकरात लवकर म्हणजे सप्टेंबरच्या शेवटापर्यंत ही लस लोकांपर्यंत पोहोचण्याचा सकारात्मक अंदाज या लसीशी संबंधित शास्त्रज्ञ व्यक्त करत आहेत.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button