Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण

“तुमच्या आणि माझ्यासाठीच…”, नितेश राणेंनी थोपटली आदित्य ठाकरेंची पाठ; नेमकं काय घडलं?

मुंबई: सध्या राज्याच्या विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनादरम्यान विधानसभा आणि विधानपरिषदेत विविध विषयांवर चर्चा पार पडत असल्याचं पाहायला मिळतं. या अधिवेशनाच्या दरम्यान सत्ताधारी आणि विरोधक अनेकदा विविध प्रश्नांवरून आमने-सामने आल्याचंही पाहायला मिळतं. तसेच सभागृहात अनेकदा सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जंपुल्याचं पाहायला मिळतं. मात्र, आज विधानभवनात एक वेगळं चित्र पाहायला मिळालं आहे.

शिवसेना ठाकरे पक्षाचे आमदार आदित्य ठाकरे आणि भारतीय जनता पक्षाचे नेते तथा मंत्री नितेश राणे हे या पावसाळी अधिवेशनाच्या दरम्यान विधानभवनाच्या परिसरात आमने-सामने आले असल्याचं पाहायला मिळालं. यावेळी मंत्री नितेश राणे यांनी आदित्य ठाकरे यांच्या पाठीवर थाप दिली. विधानभवनाच्या परिसरात हा एक दुर्मिळ क्षण पाहायला मिळाला. या प्रसंगाचा व्हिडीओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

हेही वाचा –  राज्याला मिळाले 16 नवे आमदार; महायुतीची ताकद आणखी वाढली

भारतीय जनता पक्षाचे नेते तथा मंत्री नितेश राणे आणि शिवसेना ठाकरे पक्षाचे आमदार आदित्य ठाकरे हे कायम एकमेकांवर टीका करताना पाहायला मिळतात. राजकारणातील कट्टर प्रतिस्पर्धी म्हणूनही त्यांच्याकडे पाहिलं जातं. एवढंच नाही तर राजकीय वर्तुळात अनेकदा राणे विरुद्ध ठाकरे असा सामना रंगल्याचं आपण पाहिलं. मात्र, आज महाराष्ट्राला एक वेगळं चित्र पाहायला मिळालं आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button