Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीअध्यात्म । भविष्यवाणीताज्या घडामोडीपश्चिम महाराष्ट्रपिंपरी / चिंचवडमहाराष्ट्रमुंबईराष्ट्रिय

आमदार महेश लांडगे यांचा विविध खात्यांच्या मंत्र्यांसोबत मुंबईत बैठकांचा सपाटा, मंत्र्यांना निवेदनाद्वारे कार्यवाहीची मागणी

पिंपरी चिंचवड । महाईन्यूज ।

भोसरी विधानसभा मतदार संघासह पिंपरी-चिंचवडमधील राज्य सरकारशी संबंधित प्रलंबित विषयांवर तोडगा काढून विकासकामांतील अडथळे दूर करावेत, अशी मागणी भाजपा शहराध्यक्ष व आमदार महेश लांडगे यांनी केली आहे. “पिंपरी-चिंचवडमधील नागरिकांना पायाभूत सुविधा देण्यात अडथळा निर्माण होणार नाही. प्रशासकीय पातळीवर ताबडतोब कार्यवाही करण्यात येईल, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले असल्याची माहिती भोसरीचे आमदार महेश लांडगे यांनी दिली.

आमदार लांडगे म्हणाले की, भोसरी विधानसभा मतदार संघासह पिंपरी-चिंचवडमधील विविध प्रकल्प आणि विकासकामांबाबत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. सविस्तर निवेदन देण्यात आले. तसेच, संबंधित विभागाचे मंत्री दादा भुसे, अब्दुल सत्तार, गुलाबराव पाटील यांच्याशी विविध मुद्यांवर सकारात्मक चर्चा करण्यात आली. मुख्यमंत्री आणि मंत्री महोदय यांच्या मार्गदर्शनाखाली विविध प्रकल्प आणि विकासकामांना गती मिळेल, असा विश्वास आहे. असे आमदार लांडगे यांनी सांगितले.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button