TOP Newsताज्या घडामोडीपुणेराजकारण

भाजप सर्वात मोठा पक्ष, चार राज्यात भाजपची आघाडी, पंजाब मध्ये आपची सुनामी, कॉग्रेसचा सुपडा साफ

पुणे | उत्तर प्रदेश, पंजाब, उत्तराखंड, गोवा आणि मणिपुर झालेल्या विधानसभा निवडणुकीचे निकाल येऊ लागले आहेत. आतापर्यंतचा निकाल पाहिला असता पंजाबमध्ये आप आघाडीवर असून उर्वरीत चार राज्यांमध्ये भाजप आघाडीवर आहे.

उत्तर प्रदेश –

उत्तर प्रदेश राज्यात पुन्हा एकदा भाजप सत्ता स्थापन करेल असं दिसतंय. उत्तर प्रदेशात विधानसभेच्या एकुण ४०३ जागा आहे. त्यापैकी भाजप २५५ तर सपा ९९ जागांवर आघाडीवर आहे. तर कॉंग्रेस ४, बसपा ४ आणि इतर जागांवर आघाडीवर आहे.

पंजाब –

पंजाब राज्यात आम आदमी पक्षाने सत्ताधारी कॉंग्रेसला मोठा धक्का दिलाय. पंजाब राज्यात विधानसभेचे ११७ सीट्स आहेत. यापैकी आम आदमी पक्ष हा ८८ जागांवर आघाडीवर आहे. कॉंग्रेस केवळ ११, अकाली दल ११, भाजप ६ जागांवर आघाडीवर आहे.

उत्तराखंड –

उत्तराखंड राज्यातही भाजप आघाडीवर आहे. उत्तराखंड राज्यात विधानसभेच्या ७० जागा आहेत. यापैकी भाजप ४१ जागांवर आघाडीवर आहे, तर कॉंग्रेस २५ जागांवर आघाडीवर आहे. इतर पाच जागांवर आघाडीवर आहे.

गोवा –

गोवा राज्यातही भापजला सत्ता राखण्यात यश येईल असं दिसतयं. गोवा राज्यात विधानसभेच्या ४० जागा आहेत. यापैकी भाजप जागांवर १८ आघाडीवर आहे. तर कॉंग्रेस १४ जागांसह दुसऱ्या स्थानावर आहे. तसेच महाराष्ट्रवादी गोमन्तक पक्ष हा ५ जागांवर आघाडीवर असून गोव्यातही पुन्हा भाजप सरकार येण्याचं चित्र आहे.

मणिपूर –

मणिपूर राज्यातही भाजप आघाडीवर आहे. मणिपूर राज्यात विधानसभेच्या ६० जागा आहेत. यापैकी भाजप २७, कॉ्ंग्रेस १०, एनपीएफ ६, एनपीपी ११ जागांवर आघाडीवर आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button