पिंपरी / चिंचवड

पादचारी व्यक्तीचा मोबाईल फोन पळवला

पिंपरी l प्रतिनिधी

रात्रीच्या वेळी रस्त्याने वॉकिंग करत असलेल्या व्यक्तीच्या हातातील 10 हजार रुपये किमतीचा मोबाईल फोन दुचाकीवरून आलेल्या चोरट्याने जबरदस्तीने हिसकावून नेला. ही घटना मंगळवारी (दि. 8) रात्री साडेनऊ वाजता गंगा आशियाना सोसायटी जवळ थेरगाव येथे घडली.

मंदार नारायणराव कोठावदे (वय 45, रा. थेरगाव) यांनी याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार एका अनोळखी चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी मंगळवारी रात्री साडेनऊ वाजताच्या सुमारास आदित्य बिर्ला रुग्णालयाकडून थेरगावकडे जाणाऱ्या रस्त्यावर वॉकिंग करत होते. ते गंगा आशियाना सोसायटी जवळ आले असता एका दुचाकीवरून आलेल्या अनोळखी चोरट्याने फिर्यादी यांच्या हातातून 10 हजार रुपये किमतीचा मोबाईल फोन जबरदस्तीने हिसकावून नेला. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button