breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

परमबीर सिंह खंडणीप्रकरणी दोघांना पोलीस कोठडी

मुंबई |

माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह, सुनील जैन आणि संजय पुनामिया यांच्यासह पाच जणांविरोधात सुमारे पाच कोटी रुपयांची खंडणी उकळल्याचा गुन्हा कोपरी पोलीस ठाण्यात दाखल आहे. यातील सुनील आणि संजय या दोघांचा ताबा मुंबई पोलिसांकडून ठाणे पोलिसांना मिळाला आहे. या दोघांना शनिवारी ठाणे न्यायालयात हजर केल्यानंतर त्यांना १२ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. परमबीर सिंह हे ठाणे पोलीस आयुक्त असताना २०१८ मध्ये यूएलसी घोटाळ्याप्रकरणी एका बांधकाम व्यावसायिकाला ठाणे पोलिसांनी अटक केली होती.

त्यांच्याविरोधातील मोक्का कायद्यांतर्गत होणारी कारवाई टाळण्यासाठी परमबीर सिंह, ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेचे तत्कालीन उपायुक्त पराग मणेरे, सुनील जैन, संजय पुनामिया, मनोज घोटेकर यांनी ४ कोटी ६८ लाख रुपयांची खंडणी उकळल्याचा आरोप बांधकाम व्यावसायिकाच्या पुतण्याने केल्यानंतर याप्रकरणी कोपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.  काही दिवसांपूर्वीच सुनील आणि संजय यांना एका खंडणीच्या प्रकरणात मुंबई पोलिसांनी अटक केली होती. कोपरी पोलिसांनी शुक्रवारी सुनील आणि संजय या दोघांचा ताबा मुंबई पोलिसांकडून घेतला. त्यांना न्यायालयाने त्यांना १२ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button