breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण

राणा दाम्पत्याला भाजपने दिली सुपारी, अनिल गोटेंचा गंभीर आरोप; सुपारी का दिली? तेही सांगितले…

धुळे |

नवनीत राणा प्रकरणावरून धुळ्याचे माजी आमदार तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष अनिल गोटे यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. नवनीत राणा प्रकरण हे राज्यातील महाविकास आघाडी सरकार अस्थिर करण्याचा भाजपचा प्रयत्न असल्याचा घणाघाती आरोप अनिल गोटे यांनी केला आहे. गेल्या काही महिन्यांपासून बघितलं तर महाराष्ट्रात दंगे घडावे, राज्यात अशांतता निर्माण व्हावी आणि याचे सारे खापर महाविकास आघाडी सरकारवर फुटावे असा प्रयत्न भाजपतर्फे सुरू आहे, असा गोटेंनी केला.

‘मातोश्री’च्या बाहेर हनुमान चालीसा पठण करण्यावरून नवनीत राणा यांनी घातलेल्या वादावर माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्यावरही अनिल गोटेंनी टीका केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या घरावरबाहेर झालेल्या हिंसक आंदोलनानंतर कुठल्याही ज्येष्ठ नेत्याच्या घरावर हल्ला करणं हे चुकीचं असल्याचं फडणवीस म्हणाले होते. परंतु नवनीत राणा यांनी मातोश्री बाहेर हनुमान चालीसा पठण करणार असल्याची घोषणा केल्यानंतर फडणवीसांनी त्यांना का थांबवले नाही? असा सवाल गोटेंनी केली. देवेंद्र फडणवीस हे फार कपटी माणूस आहे, असं म्हणत गोटेंनी खोचक टीका केली.

नवनीत राणा प्रकरणासंदर्भात गोटे यांनी भाजपची भूमिका ही ‘मी नाही त्यातली आणि कडी लावा आतली’ अशीच काहीशी आहे. प्रकरणामध्ये भाजपनं उघडउघड पाठिंबा न देता हे सर्व प्रकरण घडवून आणल्याचा आरोप त्यांनी केला. नवनीत राणा प्रकरण भाजपकडून व्यवस्थितपणे चिघळवण्यात येत आहे. मुंबई पोलिसांनी राणा दाम्पत्यास पूर्णपणे समजावण्याचा प्रयत्न केला. पण जेव्हा मुंबई पोलिसांच्या जीवावर आली तेव्हा हे सर्व प्रकरण प्रकरण चिघळलं. भाजपचा हा कांगावा असून याला महाराष्ट्राची जनता विटली आहे, असं गोटे म्हणाले. आपल्या अधिपत्याखाली असलेल्या अधिकारांचा वापर करून विरोधकांना नामशेष करण्याचा प्रयत्न भाजपतर्फे सुरू आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button