breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण

महाराष्ट्रात महायुती की महाविकास आघाडी? लोकसभेत कोण मारणार बाजी? सर्वेक्षणाचा धक्कादायक निष्कर्ष

Loksabha Election 2024 : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सत्ताधारी आणि विरोधकांनी तयारीला सुरूवात केली आहे. महाराष्ट्रातील महाविकास आघाडी आणि महायुतीनं कंबर कसली आहे. अशातच महायुतीचं टेन्शन वाढवणारा धक्कादायक सर्वे समोर आला आहे. सी व्होटरच्या ओपिनियन पोलनुसार महायुतीला ३७ टक्के तर महाविकास आघाडीला ४१ टक्के मतं मिळू शकतात.

महाराष्ट्रात लोकसभेच्या एकूण ४८ जागा आहेत. ओपिनियन पोलमध्ये काँग्रेसचा वरचष्मा दिसतोय. आज जर महाराष्ट्रात लोकसभेची निवडणूक झाली असती तर महायुतीला (भाजप+ शिंदे गट+ अजित पवार गट) १९ ते २१ जागा मिळतील. तर महाविकास आघाडीला (काँग्रेस + ठाकरे गट + शरद पवार गट) २६ ते २८ जागा मिळतील.

हेही वाचा  –  धक्कादायक! देशात गेल्या २४ तासांत ६५६ नवीन कोरोना रूग्णांची नोंद

कुणाला किती मते?

मतांच्या टक्केवारीतही महाविकास आघाडी वरचढ दिसत आहे. महाविकास आघाडीला ४१ टक्के मते मिळू शकतात. तर, महायुतीला ३७ आणि बाकी पक्षांना २२ टक्के मते मिळतील, असं अंदाज सर्वेत म्हटलं गेलं आहे.

टीप : सर्वेक्षणातून समोर आलेले निकष पूर्णपणे लोकांकडून मिळालेल्या उत्तरांवर आधारित आहेत. आम्ही यांसदर्भात कोणताही दावा करत नाही.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button