breaking-newsताज्या घडामोडीपुणे

भयंकर घटना! पेट्रोल ओतून महिलेला जाळले, आरोपीचाही होरपळून मृत्यू; कारण होतं…

पुणे |

कामावरून काढून टाकल्याच्या रागातून कामगाराने लेडिज टेलरींगचे दुकान चालवणाऱ्या महिलेला पेट्रोल ओतून लायटरने पेटवून दिल्याची घटना सोमवारी रात्री ११ वाजता घडली. या घटनेत दुकान चालवणारी महिला गंभीर जखमी झाली होती. महिलेला जाळण्याचा प्रयत्न करत असताना आरोपी देखील होरपळल्याने गंभीर जखमी झाला होता. रुग्णालयात उपचारादरम्यान त्याचा मध्यरात्री मृत्यू झाला. महिलेचा आज सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास मृत्यू झाला. महिलेला वाचवण्यासाठी मदतीला धावलेला आरोपीचा मित्र देखील गंभीर जखमी झाला आहे. या प्रकरणी चंदननगर पोलिसांनी आरोपीवर खुनाचा प्रयत्न केल्याचा (३०२ ) गुन्हा दाखल केला आहे.

एटी टू झेड लेडिज टेलरींगचे दुकान चालवणाऱ्या बाला नोया जॉर्नी (वय ३२) या महिलेला जाळण्याचा प्रयत्न आरोपीने केला. ही महिला मूळची ओरिसाची आहे आणि वडगाव शेरी येथे राहत होती. दुकानात काम करणारा कामगार मिलिंद गोविंदराव नाथसागर (वय ३५) याने पेट्रोल ओतून या महिलेला जाळण्याचा प्रयत्न केला. कामावरून काढून टाकल्याच्या रागातून आरोपी कामगाराने महिलेवर पेट्रोल ओतल्याचे समोर आले आहे. यात महिला ९० टक्के भाजली होती. आरोपीच्या मृत्युंनतर तिचाही आज मृत्यू झाला.

पुण्यातील वडगाव शेरीमध्ये नगर रस्तात्यावर सोमनाथ नगरमध्ये रामचंद्र सभागृहशेजारी ही घटना घडली. टेलरींगच्या दुकानाला आग लागल्याची माहिती सुरवातीला होती. या अग्निशमन दलाचे वाहन पोहोचण्याआधीच स्थानिकांनी आग नियंत्रणात आणली. याघटनेत ३ जण होरपळले होते. यात जखमी २ पुरूष आणि एका महिलेला रुग्णालयात दाखल केले गेले होते. यात पुरुषाचा रात्रीच मृत्यू झाला, अशी प्राथमिक माहिती मिळाली होती.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button