breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणेराजकारण

मोठी बातमी : ‘घड्याळ’ चिन्हावरच चिंचवडची निवडणूक लढवणार : विरोधी पक्षनेते अजित पवार

पिंपरी-चिंचवडमधील पदाधिकाऱ्यांना आश्वासन 

भाजपाला आव्हान देण्यासाठी इच्छुकांचे देव पाण्यात

पिंपरी । विशेष प्रतिनिधी 

पिंपरी-चिंचवड विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीची जागा राष्ट्रवादी काँग्रेसला देण्याबाबत शिवसेना, काँग्रेसच्या नेत्यांशी माझी चर्चा सुरु आहे. चिंचवडमधील जागा महाविकास आघाडीतून राष्ट्रवादीला सुटेल असा विश्वास व्यक्त करत कोणत्याही परिस्थितीत चिंचवडची निवडणूक घड्याळ चिन्हावरच लढविणार असल्याचे विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सांगितले.

चिंचवड विधानसभेची पोटनिवडणूक लढविण्यासाठी इच्छुक असलेल्यांना अजित पवार यांनी आज (गुरुवारी) पुण्यातील बारामती होस्टेल येथे बोलावून घेतले होते. इच्छुक असलेले भाऊसाहेब भोईर, नाना काटे, नवनाथ जगताप, मयुर कलाटे, मोरेश्‍वर भोंडवे, प्रशांत शितोळे, माया बारणे, राजेंद्र जगताप, ॲड. गोरक्ष लोखंडे, माधव पाटील यांच्याशी अजितदादांनी वैयक्तिकरित्या चर्चा केली. त्यानंतर त्यांनी प्रमुख पदाधिकाऱ्यांशी एकांतात आणि पुन्हा सर्वांशी एकत्र चर्चा केली.

शहराध्यक्ष अजित गव्हाणे, चिंचवडचे निरीक्षक आणि मावळचे आमदार सुनील शेळके, पिंपरीचे आमदार आण्णा बनसोडे, माजी आमदार विलास लांडे, माजी महापौर आझम पानसरे, संजोग वाघेरे, मंगला कदम, माजी सभागृह नेते जगदीश शेट्टी आदी यावेळी उपस्थित होते.

अजित पवार यांनी इच्छुक, शहरातील पदाधिका-यांशी सविस्तरपणे चर्चा केली. चिंचवडला राष्ट्रवादीचाच उमेदवार असेल. त्यामुळे पदाधिकाऱ्यांनी, कार्यकर्त्यांनी पक्षाचा प्रचार सुरु करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button