breaking-newsराष्ट्रिय

देशात गेल्या २४ तासांत तब्बल ६१ हजार ५३७ कोरोना रुग्ण

मुंबई – दिवसेंदिवस कोरोनाबाधितांचा आकडा वाढत असतानाच आजही भारतात सर्वाधिक कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. गेल्या २४ तासांत तब्बल ६१ हजार ५३७ कोरोना रुग्ण सापडले आहेत. तर, ९३३ रुग्णांच्या मृत्यूंची नोंद करण्यात आली आहे. ऑगस्ट महिन्यात भारतात आतापर्यंत सर्वाधिक रुग्ण सापडले आहेत. अमेरिका आणि ब्राझीलपेक्षाही ही संख्या अधिक आहे. ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या सहा दिवसांमध्येच भारत करोनाबाधितांच्या सर्वाधिक रुग्णसंख्येमध्ये तिसऱ्या स्थानावर पोहोचला.

नव्या रुग्णसंख्येमुळे देशात आता 20 लाख 88 हजार 612 रुग्ण झाले आहेत. यामध्ये 6 लाख 19 हजार 088 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत तर, १४ लाख २७ हजार ००६ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर, आतापर्यंत ४२ हजार ५१८ लोकांना कोरोनामुळे जीव गमवावा लागला आहे.

ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या ६ दिवसांमध्ये देशात ३ लाख २८ हजार ९०३ नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली. तर अमेरिकेत सहा दिवसांमध्ये ३ लाख २६ हजार १११ रुग्णांची नोंद झाली. तर ब्राझीलमध्ये २ लाख ५१ हजार २६४ नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली होती. २ ऑगस्ट, ३ ऑगस्ट, ५ ऑगस्ट आणि ६ ऑगस्ट रोजी जगातील सर्वाधिक रुग्णांची नोंद भारतात झाली. तर गुरूवारीच देशातील कोरोनाबाधितांच्या संख्येनं २० लाखांचा टप्पा पार केला.

करोनामुळे सुरूवातीच्या सहा दिवसांमध्ये अमेरिका आणि ब्राझीलमध्ये ६ हजार जणांचा मृत्यू झाला. तर दुसरीकडे भारतात ५ हजार ०७५ जणांच्या मृत्यूंची नोंद करण्यात आली. तर दुसरीकडे शुक्रवारी महाराष्ट्र आणि आंध्र प्रदेशमध्ये १० हजारांपेक्षा अधिक रुग्णांची नोंद करण्यात आली. बिहार, तेलंगण, ओदिशा, पंजाब आणि मणिपुरमध्ये आतापर्यंतच्या सर्वाधिक रुग्णसंख्येंची नोंद झाली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button